शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

Karvir Vidhan Sabha Election 2024: ‘करवीर’च्या नभी ‘चंद्रदीप’; राहुल पाटील यांची निकराची झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 18:49 IST

श्वास रोखून धरायला लावणाऱ्या लढतीत १९७६ मतांनी विजयी : 

प्रकाश पाटीलकोपार्डे : अंत्यत अटीतटीने झालेल्या करवीर विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसचे राहुल पाटील यांचा अवघ्या १९७६ मताधिक्यांनी पराभव केला. गेल्या पाच वर्षात घेतलेली मेहनत, आक्रमक राबवलेली प्रचार यंत्रणा आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद यामुळे नरके तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले आहेत. तर, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्याबद्दलची सहानुभूतीच्या बळावर राहुल पाटील यांनी निकराची झुंज दिली. पण, थोडक्यात पराभव पत्कारावा लागला.सकाळी आठपासून ‘करवीर’च्या मतमोजणीला शासकीय बहुउद्देशीय सभागृहात सुरुवात झाली. टपाली मतदानामध्ये राहुल पाटील यांनी आघाडी घेतली. मतदान यंत्रावरील मोजणीस पन्हाळ्यातून सुरुवात झाली. येथे अपेक्षेप्रमाणे नरके यांनी आघाडी घेतली. पन्हाळ्यातील सहा फेरीमध्ये नरके यांनी ११ हजार २७२ चे मताधिक्य घेतले. गगनबावडा तालुक्यातील तीन फेरीत काँग्रेसचे राहुल पाटील यांनी ३४७० चे मताधिक्य मिळाले. त्यामुळे, नरके ७९१९ चे मताधिक्य घेऊन करवीरमध्ये आले. येथे आल्यावरही नरके यांनी आघाडी कायम राखली.बाराव्या फेरीअखेर नरके यांचे १२ हजार ७२१ चे मताधिक्य राखले. त्यानंतर सडोली खालसा, परिते परिसरात पाटील यांनी मताधिक्य कमी करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना विजयापर्यंत पोहचता आले नाही. शेवटच्या फेरीअखेर १९७६ इतक्या मताधिक्यांनी विजयावर मोहर उमटवली.दरम्यान, सायंकाळी चार वाजता अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्षा शिंगण यांनी जाहीर केला. अतिशय शांततेत व विना तक्रार मतमोजणी प्रक्रिया पार पडली, करवीरचे पाेलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला हाेता.विजयाची कारणे 

  • पराभूत होऊनही पाच वर्षात ठेवलेला संपर्क
  • मित्र पक्षांना सोबत घेऊन राबवलेली आक्रमक प्रचार यंत्रणा
  • लाडकी बहीण, वयोश्री व श्रावणबाळ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी

पराभवाची कारणे 

  • ‘पी. एन.’ यांची सहानूभूतीपण, जुन्या करवीरमधील जोडण्या कमी पडल्या
  • विरोधकांवर आक्रमकपणे हल्ला करण्यात कमी
  • जनसुराज्य पक्षाचे संताजी घोरपडे यांच्या उमेदवारीचा फटका

‘करवीर’चा नरकेंना हातचंद्रदीप नरके यांना पन्हाळ्यातून अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने त्यांची धाकधूक वाढली होती. मात्र, मागील तीन निवडणुकांपेक्षा यावेळेला जुन्या ‘करवीर’ करांनी नरके यांना हात दिल्याने काँग्रेसच्या हाताला फटका बसल्याची चर्चा आहे. येथे ९५०० चे मताधिक्य राहिले.

नरकेंना पन्हाळ्यात झटकापन्हाळा हा चंद्रदीप नरके यांचा बालेकिल्ला, पण मागील निवडणूकीपासून बालेकिल्ला ढासळू लागला. नरके यांनी केलेली मेहनत पाहता त्यांना येथून किमान १७ हजाराचे मताधिक्य राहील, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. पण केवळ ११ हजार २७२ चे मताधिक्य राहिले, मागील निवडणूकीपेक्षाही हे मताधिक्य कमी राहिले.

‘राहुल’ यांचे गगनबावड्यातील मताधिक्य घटलेगगनबावडा तालुका आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठेचा केला होता, पण तिथे जाऊन चंद्रदीप नरके यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यात त्यांना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांची साथ मिळाल्याने पाटील यांना अपेक्षित असलेले ७ हजारांचे मताधिक्य मिळाले नाही.

दृष्टिक्षेपात मतदान -

  • एकूण मते - ३,२५,१६१
  • मतदान यंत्रावर झालेली मते : २,७६,२४५
  • पोस्टल मते : २६८४
  • पोस्टल अवैध : २४५
  • एकूण झालेली मते : २,७८,९२९
  • वैद्य मते : २,७८,६८४

शिवसेना संपवण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या नेत्यांची काँग्रेस संपली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ‘करवीर’च्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, त्यास पात्र राहून काम करू. माझ्या विजयात महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे असून मी त्यांचा ऋणी आहे. -चंद्रदीप नरके (आमदार) 

‘करवीर’च्या जनतेने दिलेला कौल मान्य असून आगामी काळात दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे विकासाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहू. - राहुल पाटील

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024karvir-acकरवीरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024