शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक एकमेकांना भिडले, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 12:19 IST

कागल : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी एका वृत्तवाहिनीने येथील गैबी चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ...

कागल : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी एका वृत्तवाहिनीने येथील गैबी चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या समर्थकांत जोरदार राडा झाला. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी केली. तसेच बांधकामासाठी आणलेल्या विटा एकमेकांवर फेकण्यात आल्या. यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले. यावेळी झालेल्या रेटारेटीत गैबी चौकात उभ्या असणाऱ्या काही दुचाकीही खाली पडल्या. दरम्यान, या घटनेची कोणतीही नोंद रात्री उशिरापर्यंत कागल पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. या घटनेची अधिक माहिती अशी की, या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या या चर्चेत गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे हे निवेदक होते. त्यांना पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. सुरुवातीला वीस मिनिटे ही चर्चा व्यवस्थित सुरू होती. मात्र, एका साखर कारखान्याच्या विषयावर टीकाटिप्पणी होत गेल्याने जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि वाद वाढत जाऊन हाणामारी सुरू झाली. काही कार्यकर्त्यांनी पॅडी कांबळे यांना तसेच वृतवाहिनीच्या प्रतिनिधींना सुरक्षितरीत्या तेथून बाजूला नेले.

हे झाले होते सहभागीमुश्रीफ गटाकडून भय्या माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, संजय चितारी, सौरभ पाटील, अमित पिष्टे आदींनी सहभाग घेतला होता, तर समरजित घाटगे गटाकडून बाळासाहेब हेगडे, राजेंद्र जाधव, रमेश मुजावर, प्रतीक कदम, साई ढोणे आदींनी भाग घेतला होता.अशा कार्यक्रमांना आता परवानगी नाहीपोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर अशा खुल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमातून होणार असेल तर प्रशासनाने या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये यासाठी आपण दक्षता घेणार आहोत. तसेच या घटनेची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे