शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

कागलची यंदाची निवडणूक नायक विरुद्ध खलनायक, पालकमंत्री मुश्रीफ यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 13:21 IST

बोरवडे : मी केलेल्या विकासकामांचा डोंगर पाहिला तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील. यंदाची निवडणूक ही ‘नायक विरुद्ध खलनायक’ अशी ...

बोरवडे : मी केलेल्या विकासकामांचा डोंगर पाहिला तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील. यंदाची निवडणूक ही ‘नायक विरुद्ध खलनायक’ अशी होणार असून जनतेने आपल्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. बोरवडे ( ता. कागल ) येथे आयोजित गाव भेट दौऱ्यात ते बोलत होते. रघुनाथ कुंभार अध्यक्षस्थांनी होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले, आपण केलेल्या प्रचंड कामाच्या बळावर आपला सहावा विजय निश्चित असून, यंदाच्या विजयात संजय घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा वाटा निश्चितच मोठा असणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना भविष्यात मानसन्मान देण्याचा आपण शब्द दिला असून, त्याला तडा जाऊ देणार नाही.माजी आमदार घाटगे म्हणाले, अनेक वर्षे आपल्याला सामान्य माणसांनी पाठबळ दिले. परंतु सत्तेच्या राजकारणात त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यात आपण कमी पडलो. त्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी आपण मुश्रीफ यांना बिनशर्त पाठिंबा दिला.बिद्री साखर कारखान्याचे संचालक मनोज फराकटे म्हणाले, कागल मतदार संघात एकही असे गाव नाही, की त्या गावात मुश्रीफ यांची रुग्णसेवा पोहचली नाही.यावेळी रघुनाथ कुंभार यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी साताप्पा साठे, तानाजी साठे, सुनील मगदूम, जयदीप पोवार, पांडुरंग पाटील, ज्ञानदेव फराकटे, प्रदीप कांबळे, उपसरपंच विनोद वारके आदी उपस्थित होते. अशोक कांबळे यांनी स्वागत केले. उपसरपंच विनोद वारके यांनी आभार मानले.

मुश्रीफ गहिवरले..!मंत्री मुश्रीफ यांच्या विधानसभेच्या सहाही निवडणुकांत बोरवडे गावाने त्यांना महत्त्वपूर्ण मताधिक्य दिले होते. गावचे माजी सरपंच व बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांनी मंत्री मुश्रीफ यांची सातत्याने पाठराखण केली. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर प्रथमच झालेल्या संवाद भेटीवेळी सर्वच वक्त्यांनी स्व. फराकटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मंत्री मुश्रीफही त्यांच्या आठवणीने गहिवरले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे