शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जनताच महायुतीला गायब करेल, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:04 IST

''..त्यावेळी धनंजय महाडिक बोलले का?''

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे झालेला अपमान राज्यातील जनता विसरलेली नाही. त्यामुळे २० नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर महायुती राज्यातून गायब होईल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. महायुतीच्या नेत्यांनी आमच्यावर बोलू नये. संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर केलेल्या टीकेवर धनंजय महाडिक बोलले का? असा सवाल आमदार पाटील यांनी केला.कोल्हापूर उत्तरच्या माघारी नाट्यावर पडदा टाकायचा निर्णय मी घेतला आहे. जे घडले त्यावर आता बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. पुढे कसे जायचे, यासंदर्भात महाविकास आघाडीतील घटक पक्षांची चर्चा करणे आवश्यक आहे. इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली असून, लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मदत करण्याची भूमिका घेतल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.सगळ्यांना सोबत घेणार, टीका टाळणारशिरोळमध्ये वंचितने माघार घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर उत्तरमध्येही वंचित आमच्यासोबत राहील हे आम्हाला फायदेशीर आहे. जिथे शक्य आहे तिथे माघार घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील पंधरा दिवस मला सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असून, मी कोणावरही टीकाटिप्पणी करणार नसल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलMahayutiमहायुती