शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
2
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
3
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
4
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
5
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
6
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
7
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
8
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
9
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
10
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
11
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
12
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
13
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
14
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
15
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
16
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
17
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
18
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
19
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
20
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड

कोल्हापूर जिल्ह्यात मतदानामध्ये कागल आघाडीवर, इचलकरंजी पिछाडीवर, एकूण किती टक्के झाले मतदान..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 10:01 IST

कोल्हापूर : पंधराव्या विधानसभेसाठी जिल्ह्यात आज, बुधवार (दि.२०) सकाळपासून मतदार मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडले आहेत. अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा ...

कोल्हापूर : पंधराव्या विधानसभेसाठी जिल्ह्यात आज, बुधवार (दि.२०) सकाळपासून मतदार मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडले आहेत. अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. सकाळी ७ वा.पासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात ३ हजार ४५२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ७.३८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक मतदान कागल विधानसभा मतदारसंघात झाले आहे. ११ वाजेपर्यंत करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान झाले. 

जिल्ह्यातील सायंकाळी ५ पर्यंत ६७.९७ टक्के मतदान झाले. कागल मतदारसंघात सर्वाधिक ७४.३३ टक्के मतदान झाले आहे. अनेक मतदान केंद्रावर अजून देखील गर्दी आहे. जिल्ह्यात दहा मतदारसंघांत अटीतटीच्या लढती होत असून सध्या महायुतीच्या माध्यमातून सत्तेवर असलेल्यांविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल, माजी आमदार अमल महाडिक, जनसुराज्यचे अशोकराव माने, माजी आमदार चंद्रदीप नरके रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात समरजित घाटगे, राजेश लाटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर, गणपतराव पाटील, मदन कारंडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तर राधानगरीतून अपक्ष ए. वाय. पाटील, शिरोळमधून स्वाभिमानीकडून माजी आमदार उल्हास पाटील, हातकणंलेतून स्वाभिमानीकडून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, चंदगडमधून अपक्ष शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील, जनसुराज्यचे मानसिंग खोराटे, करवीरमधून जनसुराज्यचे संताजी घोरपडे हेदेखील आपले नशीब अजमावत आहेत.सकाळी ७ ते  ९ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • चंदगड -  ६.७८ टक्के 
  • राधानगरी -  ६.६७  टक्के
  • कागल – ८.७८ टक्के
  • कोल्हापूर दक्षिण – ७.२५ टक्के
  • करवीर – ७.७६ टक्के
  • कोल्हापूर उत्तर – ८.२५ टक्के
  • शाहूवाडी – ७.२३ टक्के
  • हातकणगंले – ६.२० टक्के
  • इचलकरंजी – ७.४७ टक्के
  • शिरोळ – ७.५३ टक्के

सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदानसकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • चंदगड – २२.०१  टक्के 
  • राधानगरी -  २३.०० टक्के
  • कागल –  २३.६८ टक्के
  • कोल्हापूर दक्षिण –  १७.५७  टक्के
  • करवीर – २६.१३ टक्के
  • कोल्हापूर उत्तर – २०.७५  टक्के
  • शाहूवाडी – १७.५२  टक्के
  • हातकणगंले – १४.२५  टक्के
  • इचलकरंजी –  १९.७७ टक्के
  • शिरोळ – २१.४३  टक्के

दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • चंदगड  –  ३९.१९  टक्के 
  • राधानगरी – ४२.८२ टक्के
  • कागल  – ४१.३६  टक्के
  • कोल्हापूर दक्षिण – ३५.१५ टक्के
  • करवीर –  ४५.२९ टक्के
  • कोल्हापूर उत्तर – ३५.५३  टक्के
  • शाहूवाडी –  ४१.३०  टक्के
  • हातकणगंले –  ३५.१५  टक्के
  • इचलकरंजी – ३२.७९   टक्के
  • शिरोळ – ३७.०३  टक्के 

दुपारी ३ वाजेपर्यंत आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • चंदगड  – ५४.६३  टक्के 
  • राधानगरी – ५९.५० टक्के
  • कागल  – ५८.७१  टक्के
  • कोल्हापूर दक्षिण – ५१.२० टक्के
  • करवीर – ५८.६३  टक्के
  • कोल्हापूर उत्तर – ४८.०३ टक्के
  • शाहूवाडी –  ६१.७० टक्के
  • हातकणगंले – ५०.०१ टक्के
  • इचलकरंजी – ४५.२८ टक्के
  • शिरोळ – ५२.६६  टक्के

सायंकाळी ५ वाजेपर्यतची आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • चंदगड  – ६८.५८  टक्के 
  • राधानगरी –७२.८३ टक्के
  • कागल  –७४.३३ टक्के
  • कोल्हापूर दक्षिण – ६८.७२ टक्के
  • करवीर – ७२.१८ टक्के
  • कोल्हापूर उत्तर – ५९.७६ टक्के
  • शाहूवाडी – ७०.४० टक्के
  • हातकणगंले – ६५.१० टक्के
  • इचलकरंजी – ५७.८३ टक्के
  • शिरोळ – ६८.४९ टक्के
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलVotingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024