शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासह कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी लढतोय, राजेश लाटकर यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:25 IST

कोल्हापूर : काँग्रेस पक्षाने मला दिलेली उमेदवारी ज्या पद्धतीने बदलण्यात आली, त्यातून माझी, कुटुंबाची व कार्यकर्त्यांची बदनामी झाली. म्हणूनच ...

कोल्हापूर : काँग्रेस पक्षाने मला दिलेली उमेदवारी ज्या पद्धतीने बदलण्यात आली, त्यातून माझी, कुटुंबाची व कार्यकर्त्यांची बदनामी झाली. म्हणूनच माझ्यासह कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष निवडणूक लढत आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाला अथवा नेते आमदार सतेज पाटील यांना तोंडघशी पाडण्याचा प्रश्नच येत नाही, असे माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या मुदतीपर्यंत ‘नॉट रिचेबल’ असलेले लाटकर दुपारी चिन्ह वाटपावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकट झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना घडलेल्या घटनांची माहिती दिली.काँग्रेस पक्षाकडे मी उमेदवारी मागितली होती. सर्व प्रक्रियेतून पुढे गेल्यानंतर दि. २७ ऑक्टोबरला मला उमेदवारी जाहीर झाली; पण त्याच रात्रीपासून माझ्या नावाला विरोध व्हायला लागला. काही माजी नगरसेवकांनी आमचे नेते सतेज पाटील यांना सह्यांचे निवेदन देऊन उमेदवारी बदलाची मागणी केली. या निवेदनावर खोट्या सह्या होत्या. कोल्हापूर उत्तरशी काही संबंध नाही, अशा माजी नगरसेवकांच्या सह्या निवेदनावर होत्या. माझ्याबद्दल तक्रार होती तर पक्ष कार्यालयात बसून निरीक्षकांसमोर चर्चा व्हायला पाहिजे होती. मला थांबायला लागतंय असे सन्मानाने सांगितले असते तर मी आदेश मानून पुढे गेलो असतो. परंतु, परस्पर नाव बदलले गेले. त्यामुळे आत्मसन्मान दुखावला गेला, असे लाटकर यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांची कळकळ..मी काँग्रेस विचाराचा कार्यकर्ता आहे. पद आणि सत्तेसाठी नको त्या तडजोडी केल्या नाहीत. सतेज पाटील हे माझे नेते आहेत आणि भविष्यातही राहतील, असे सांगत ते म्हणाले, माझा खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यावर दोष नाही; पण मालोजीराजे यांनी एका कार्यकर्त्याची कळवळ ऐकून घ्यायला पाहिजे होती.

भेट टाळली..मी अपक्ष लढतोय म्हटल्यावर विरोधी पक्षाकडून संपर्क होऊ लागला होता. तुमच्यावर अन्याय झाला आहे, तुमची आमच्या नेत्यांबरोबर भेट घालून देतो, असे निरोप येत होते; पण मी क्षणिक कार्यकर्ता नसल्याने त्यांची भेट टाळली, असे लाटकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024