जोतिबा : नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधण्यात आली. श्रीचे पुजारी देवराज मिटके, उमेश शिंगे, श्रीचरण झूगर, अंकुश दादर्णे, रमेश ठाकरे यांनी आजची पुजा बांधली. आजच्या चौथ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती.सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला. उंट, घोडे, वाजंत्री देव सेवक श्री चे पुजारी सह नवरात्र उपासकाचा लवाजमा सहभागी झाला होता. नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो. तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी झाली होती. दर्शन रांग नियंत्रणासाठी पोलीस, देवस्थान समिती चे कर्मचारी व सुरक्षा रक्षक तैनात होते.मंदिरात काल, बुधवारी रात्री ज्योतिर्लिंग भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. मछिंद्र डवरी, गजानन डवरी, विश्वनाथ डवरी यांनी डवरी गीते सादर केली. रात्री उशिरा पर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते. रात्री १२ .३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.
Navratri2022: चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 14:01 IST