महापरिनिर्वाण दिन पत्रके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:01+5:302020-12-07T04:17:01+5:30
कोल्हापूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) तर्फे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव ...

महापरिनिर्वाण दिन पत्रके
कोल्हापूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) तर्फे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महात्मा फुले यांच्या पुतळ्यास जिल्हा सरचिटणीस भाऊसो काळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी तुकाराम कांबळे, भीमराव कांबळे, अशोक घाडगे, प्रकाश कांबळे, पांडुरंग कांबळे, गौतम सावंत, डी. एस. कांबळे, जालिंदर कांबळे, बाळासाहेब कांबळे, शोभा कुमठेकर, आनंदा कांबळे, संभाजी मांडरेकर, विजय कांबळे, शिवाजी कांबळे, मारुती कांबळे, दीपक कांबळे, साताप्पा कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मिलिंद हायस्कूल, कोल्हापूर : शाहूनगरातील मिलिंद हायस्कूलमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन रविवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक एम. एम. शिर्के यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सागरमाळ परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ
कोल्हापूर : सागरमाळ परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी अध्यक्ष दिलीप पेटकर, माजी नगरसेवक जनार्दन पोवार, राजू हुंबे, विलास तवार, संजीव पवार, वसंतराव तावडे, बंडोपंत पाटोळे, के. बी. पाटील, महादेव मोरे, नंदा कदम, दिलीप जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री दत्ताबाळ हायस्कूल
कोल्हापूर : कसबा बावड्यातील श्री दत्ताबाळ हायस्कूल, प्राथमिक विद्यामंदिर, इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माजी नगरसेविका पल्लवी देसाई, सचिव नीलेश देसाई, वेद देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापक सचिन डवंग, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, कीर्ती मिठारी, आदी उपस्थित होते.
जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्था
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्थेमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थाध्यक्ष राहुल माणगावकर यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रंगराव मांगोलीकर, ज्ञानदेव पाटील, हिंदुराव पनोरेकर, विकास कांबळे, नंदकुमार कांबळे, रघुनाथ मांडरे, प्रकाश पोवार, रवींद्र मोरे, रामचंद्र गडकर, भीमराव गोसावी, अण्णा पाटील, सुजाता भास्कर, कल्पना भोसले, आदी उपस्थित होते.