महांतेश कवठगीमठ यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:55+5:302021-07-30T04:26:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : कर्नाटक राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांनी नुकताच पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या ...

महांतेश कवठगीमठ यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : कर्नाटक राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांनी नुकताच पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये कर्नाटक भाजप पक्षप्रतोद महांतेश कवठगीमठ यांची मंत्री म्हणून वर्णी लागावी, अशी मागणी विठ्ठल कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
महांतेश कवठगीमठ यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगाव जिल्ह्यामध्ये विविध विकासकामे पूर्ण झालेली आहेत. ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा व नगर पंचायतींना नगरपालिकेचा दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये कवठगीमठ अण्णा यांचे मोठे योगदान आहे. कर्नाटकामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत स्वतःला झोकून देऊन भारतीय जनता पक्ष मोठा करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या मागणीची दखल घेऊन महांतेश कवठगीमठ यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी विठ्ठल कोळेकर यांनी यावेळी केली. यावेळी पद्मराज माणगावे, सामाजिक कार्यकर्ते अनिल सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे प्रमुख हभप उद्धव काजवे, सुळगाव येथील मारुती क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक-चेअरमन चंद्रकांत मारुती सुतार, देवू कोळी आदी उपस्थित होते.