कोल्हापूर जिल्हा सहकाराचा महामेरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:26 IST2020-12-06T04:26:09+5:302020-12-06T04:26:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उदगाव : कोल्हापूर जिल्ह्यात सहकार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे. एकेकाळी पतसंस्था अडचणींमध्ये होत्या त्या परिस्थितीतसुद्धा ए. ...

कोल्हापूर जिल्हा सहकाराचा महामेरू
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : कोल्हापूर जिल्ह्यात सहकार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे. एकेकाळी पतसंस्था अडचणींमध्ये होत्या त्या परिस्थितीतसुद्धा ए. पी. पाटील सर्वोदय पतसंस्थेने सभासदांचा विश्वास जपला, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील - यड्रावकर यांनी केले. ते पतसंस्थेच्या उदगाव शाखा स्थलांतर प्रसंगी बोलत होते.
यावेळी यड्रावकर म्हणाले, १९८५ मध्ये राज्यभरात सहकाराचे जाळे विणले. १९९० मध्ये स्व. ए. पी. पाटील यांनी हसूर या छोट्याशा गावात भिशीच्या माध्यमातून सुरू झालेला त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. या पतसंस्थेच्या पहिल्या दोन शाखा उदगाव व उमळवाड येथे सुरू झाल्या होत्या. उदगाव येथे जे पिकते ते तालुक्यात विकते. लवकरच पतसंस्थेचे बँकेत रूपांतर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुरुंदवाडचे शाखाधिकारी रमेश चौगुले यांनी स्वागत, तर तज्ज्ञ संचालक रमेश चौगुले यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, सावकार मादनाईक, अण्णासाहेब क्वाने यांची मनोगते झाली. कार्यक्रमास दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष दादा चौगुले, संचालक सुरेंद्र भंडे, शैलेश धुमाळ, शिलकुमार चौगुले, संजय चौगुले, बाळासो कोळी, थबा कांबळे, अनुराधा कांबळे, सूरगोंडा पाटील उपस्थित होते. अनिकेत पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळी- उदगाव येथे कार्यक्रमात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सावकर मादनाईक, स्वाती सासणे, बाबासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
छाया - अजित चौगुले
फोटो-कोलवर मेल