पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी म्हाळुंगेच्या पतीस शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST2021-09-25T04:24:54+5:302021-09-25T04:24:54+5:30

कोल्हापूर : पत्नीच्या आत्महत्येचा गुन्हा सिध्द झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी शुक्रवारी पतीस ...

Mahalunge's husband sentenced for wife's suicide | पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी म्हाळुंगेच्या पतीस शिक्षा

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी म्हाळुंगेच्या पतीस शिक्षा

कोल्हापूर : पत्नीच्या आत्महत्येचा गुन्हा सिध्द झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी शुक्रवारी पतीस एक महिन्याची साधी शिक्षा व दोन हजारांचा दंड ठोठावला. संभाजी सदाशिव सूर्यवंशी (रा. म्हाळुंगे, ता. करवीर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

नवीन घरासाठी जागा खरेदीकरिता माहेरहून पैसे आण म्हणून तिला वेळोवेळी शिवागाळ, मारहाण करून मानसिक छळ केला. या छळास कंटाळून पत्नीने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. सरकारी वकील ॲड. शीतल रोटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दोषी पतीस शिक्षा ठोठावली.

संभाजी सूर्यवंशी याच्याशी २००४ मध्ये सविता यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. लग्नाच्या दोन वर्षांनतर आरोपीने आई आक्काताई सूर्यवंशी यांच्याशी संगनमत करून सवितास माहेरहून नवीन घरासाठी, जागा खरेदी करण्याकरिता वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण केली व तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या छळास कंटाळून सविताने ८ जानेवारी २०१५ ला म्हाळुंगे येथे आत्महत्या केली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पी. के. ताटे, किरण माने, वाडकर यांची मदत महत्त्वपूर्ण ठरली.

Web Title: Mahalunge's husband sentenced for wife's suicide