गडहिंग्लजला बुधवारी महालसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST2021-09-26T04:25:57+5:302021-09-26T04:25:57+5:30
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (२९) सकाळी ९ ते ५ यावेळेत शहरात १० ठिकाणी महालसीकरण ...

गडहिंग्लजला बुधवारी महालसीकरण शिबिर
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (२९) सकाळी ९ ते ५ यावेळेत शहरात १० ठिकाणी महालसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सुमारे ३० हजार नागरिकांना डोस देण्याचा संकल्प आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांनी दिली.
शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालय, म. दुं. श्रेष्ठी विद्यालय, आंबेडकर हॉल, साधना हायस्कूल, गडहिंग्लज हायस्कूल, क्रिएटिव्ह हायस्कूल, साने गुरुजी वाचनालय, वडरगे रोड अंगणवाडी, जागृती हायस्कूल व गणेश मंगल कार्यालय याठिकाणी ही शिबिरे होतील.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.