महागाव व्यापारी पतसंस्थेला १६ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:01+5:302021-09-26T04:27:01+5:30
मार्चअखेर महागाव व्यापारी नागरी पतसंस्थेत १७ कोटींच्या ठेवी तर १० कोटींचे कर्ज वाटप केले आहे. १६ लाखांचा निव्वळ नफा ...

महागाव व्यापारी पतसंस्थेला १६ लाखांचा नफा
मार्चअखेर महागाव व्यापारी नागरी पतसंस्थेत १७ कोटींच्या ठेवी तर १० कोटींचे कर्ज वाटप केले आहे. १६ लाखांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना ७ टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुनील खटावकर यांनी २० व्या वार्षिक सभेत दिली.
संस्थेच्या महागाव येथील प्रधान कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने ही सभा पार पडली. कोरोना महामारीत देखील ३ कोटींच्या ठेवी आणि ७७ कोटींची वार्षिक उलाढाल केल्याबद्दल सभेत कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
ज्येष्ठ संचालक रवींद्र धरणगुत्ती म्हणाले, सभासदांच्या मागणीनुसार सेफ डिपॉझिट लॉकरसह संस्थेची स्व:मालकीची दुमजली इमारत लवकरच पूर्णत्वाकडे जात आहे.
माधव पोटे-पाटील म्हणाले, येत्या आर्थिक वर्षात १०० कोटींची वार्षिक उलाढाल आणि कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
व्यवस्थापक दशरथ पाटील यांनी नोटीस व आर्थिक पत्रकांचे वाचन केले. संचालक विजय आरभावी यांनी आभार मानले.
यावेळी उपाध्यक्ष विश्वास कलाल, संचालक सुनील पट्टणशेट्टी, अशोक मगदूम, बाबासाहेब कांबळे, संजय मिरजकर, डॉ. विलास रेडेकर, अर्चना कोंडुसकर, शीला कांबळे आदीं उपस्थिती होती.