शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महाडिकांचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा : सतेज पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 16:59 IST

GokulMilk Kolhapur : महाडिकांचा कारभार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीसारखा असून कोल्हापूरात आले आणि एक एक संस्था ताब्यात घेतल्या आणि त्याचा वापर स्वतासाठी केला. मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला माहीती आहे, आपलं कोण आणि परके कोण आहे? अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. दूध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, स्वताचे टँकर वाचवण्यासाठी यांची धडपड असून दोन नंबर वाल्यांनी आमच्या आघाडीबद्दल बोलू नये, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देमहाडिकांचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा : सतेज पाटील यांची टीका दोन नंबर वाल्यांनी आमच्या आघाडीबद्दल बोलू नये

कोल्हापूर : महाडिकांचा कारभार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीसारखा असून कोल्हापूरात आले आणि एक एक संस्था ताब्यात घेतल्या आणि त्याचा वापर स्वतासाठी केला. मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला माहीती आहे, आपलं कोण आणि परके कोण आहे? अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. दूध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, स्वताचे टँकर वाचवण्यासाठी यांची धडपड असून दोन नंबर वाल्यांनी आमच्या आघाडीबद्दल बोलू नये, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.सतेज पाटील म्हणाले, सभासदांच्या पाठींब्यामुळेच आमचा आत्मविश्वास वाढला असून राजर्षि शाहू शेतकरी आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. आमच्यावर टीका करणारे धनंजय महाडीक यांचा सारखा खोटे बोलणार माणूस राजकारणात शोधून सापडणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात २०१७ ला आपला एकही टँकर नसल्याचे जाहीर केले, आणि त्यांचे चुलते आमचे ४० टँकर आहेत, म्हणून सांगतात.

लोकसभेला जननेते त्यांचा खरा चेहरा ओळखला, आताही तेच करतील. जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांच्याबद्दल विचारले असता, अशोक चराटी यांच्याशी चर्चा झाली होती, स्थानिक राजकीय दबावापोटीच त्यांनी भूमिका बदलली असली तरी ते आमच्यासोबतच राहतील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळमध्ये विरोधी आघाडीच्या विजयाची औपचारिकता राहिली आहे. सत्ता आमची येणारच आहे. गोकुळच्या कारभाराबाबत अनेक वर्षे आरोप ऐकत आहे, आता उबग आली असून सभासदांनी मताव्दारे या मंडळींना हुसकावून लावण्याची वेळ आली आहे. गोकुळमध्ये चुकीचे चालले आहे, ते थांबवण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. राजकीय अड्डा करण्याचा प्रश्नच नाही, आम्ही दोघेही मंत्री आहे, त्यामुळे गोकुळमध्ये आमचा जीव असायचे कारणच नाही. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर