शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

शेतकऱ्यांना लुटलेल्या पैशाची महाडिकांना मस्ती : सतेज पाटील यांची घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 19:39 IST

GokulMilk Election Kolhapur : आपण सगळ्यांचा बाप आहे, अशी वल्गना करणाऱ्या महादेवराव महाडीक यांना एवढी मस्ती, धाडस आले कोठून? गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लिटरमागे लुटलेल्या पैशातून ही मस्ती आली असून, स्वाभिमानी उत्पादक ती मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना लुटलेल्या पैशाची महाडिकांना मस्ती : सतेज पाटील यांची घणाघाती टीकावचननामा पूर्ण न केल्यास पुन्हा निवडणूक लढविणार नाही

कोल्हापूर : आपण सगळ्यांचा बाप आहे, अशी वल्गना करणाऱ्या महादेवराव महाडीक यांना एवढी मस्ती, धाडस आले कोठून? गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लिटरमागे लुटलेल्या पैशातून ही मस्ती आली असून, स्वाभिमानी उत्पादक ती मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.गोकुळ निवडणूक प्रचारार्थ शुकवारी करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, गेल्या २५ वर्षात टँकरच्या माध्यमातून गोकुळला लुटण्याचे काम महाडीक यांनी केले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्यांचा गोपाळ संघ का बंद पडला, महाडिकांचा कोल्हापूरशी संबंध काय? त्यांनी जिल्ह्यातील एकाही संस्थेचे संस्थापक नाहीत, आले तिथे घुसले. लोक आपल्या मागून फरफटत येतात, हुकूम केला की हजारो ठराव गोळा होतात, या मगरुरीमध्ये ते आहेत. करवीरमधील ठरावधारक स्वाभिमानी आहे, स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रेदादा व आनंदराव पाटील-चुयेकर यांनी स्वत:ची अस्मिता निर्माण केली. सत्ताधाऱ्यांना २५ वर्षे दिली, आम्हाला पाच वर्षे द्या, वचननामा पूर्ण केला नाहीतर पुन्हा निवडणूक लढणार नाही, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मधुकर जांभळे यांनी स्वागत केले. आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, करवीरच्या सभापती मीनाक्षी पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने आदी उपस्थित होते. प्राचार्य महादेव नरके यांनी उमेदवारांची ओळख करून दिली. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर