शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यातून सम्राट महाडिक रिंगणात, महादेवराव महाडिक यांची घोषणा : पक्ष मात्र गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:56 IST

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिराळा (जि. सांगली) मतदारसंघातून सम्राट महाडिक हे उमेदवार असतील, अशी घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात केली. शिवाजी चौकातील महागणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना बोलविले असल्याचेही महाडिक यांनी यावेळी सांगितले. सम्राट हे महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत.

ठळक मुद्देशिराळ्यातून सम्राट महाडिक रिंगणात महादेवराव महाडिक यांची घोषणा : पक्ष मात्र गुलदस्त्यात

कोल्हापूर : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिराळा (जि. सांगली) मतदारसंघातून सम्राट महाडिक हे उमेदवार असतील, अशी घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात केली. शिवाजी चौकातील महागणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना बोलविले असल्याचेही महाडिक यांनी यावेळी सांगितले. सम्राट हे महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत.सम्राट हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर असतानाच महाडिक यांनी भाजपच्या विद्यमान आमदाराच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवारीची घोषणा करून खळबळ उडवून दिली. येथील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी महागणपतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी आवर्जून ‘सम्राट महाडिक कोठे आहेत, त्यांनी व्यासपीठावर यावे,’ असे जाहीर केले. उपस्थितांना काही समजायच्या आतच त्यांनी ‘सम्राट महाडिक हे शिराळा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असतील,’ असे जाहीर केले.

शिवाजी चौकातील महागणपतीचे आशीर्वाद घेऊन कामाला लागण्यासाठी सम्राटला बोलाविले असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.परंतू ते कोणत्या पक्षांतून निवडणूक लढविणार हे मात्र त्यांनी जाहीर केले नाही. या मतदारसंघाचे सध्या भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक हे प्रतिनिधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघातून मानसिंगराव नाईक हे उमेदवार असतील. काँग्रेसकडून सत्यजित देशमुख यांचे नांव चर्चेत आहे. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिकkolhapurकोल्हापूरSangliसांगली