‘महाबीज’च्या बियाण्यांच्या दरात ५ टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:11 IST2019-05-14T01:11:47+5:302019-05-14T01:11:52+5:30
कोल्हापूर : महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बियाण्यांच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के वाढ झाली आहे. सोयाबीनचे २५५६ क्विंटल, ...

‘महाबीज’च्या बियाण्यांच्या दरात ५ टक्के वाढ
कोल्हापूर : महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बियाण्यांच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के वाढ झाली आहे. सोयाबीनचे २५५६ क्विंटल, तर भाताचे १९९८ क्विंटलचे बियाणे उपलब्ध आहे. ज्वारी व कडधान्याच्या पेरणीस अद्याप वेळ असल्याने त्यांचे बियाणे आलेले नाही.
वळवाचा पाऊस नसल्याने खरीप पेरण्यांसमोर अडचणी आल्या आहेत. मशागतीची कामे अद्याप धिम्या गतीने सुरू झाली असून बांध धरणे, शिवारातील धसकट (पाला-पाचोळा) वेचण्यात शेतकरी मग्न आहेत. वळीव पाऊस झाला की मशागतीच्या कामांना वेग येणार आणि धूळवाफ पेरण्या सुरू होतील. त्यादृष्टीने कृषी विभागाने तयारी केली असून, बियाण्यांची उपलब्धता करून ठेवली आहे. भाताची धूळवाफ पेरणीसाठी भाताचे विविध वाण उपलब्ध असून, ३३४५ क्विंटल भात बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी १९९८ क्विंटलची आवक झाली आहे. सोयाबीन बियाण्याची २५५६ क्विंटलची आवक झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ‘जे-३३५’ या वाणाचे १७०४ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यंदा बियाण्यांच्या दरात सरासरी ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्वारी, तूर, मूग, उदीड, बाजरीच्या पेरणीस अद्याप वेळ असल्याने बियाणे आलेले नाही. येत्या आठ-दहा दिवसांत या बियाण्यांची आवक होईल.
किलोमागे १० ते २५ रुपये अनुदान
महाबीजच्या सर्वच वाणांना अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. सात/बारा, आधार कार्ड घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वजा करून बियाणे द्यायचे आहे. संबंधित विक्रेत्याला नंतर अनुदान देते.
अनुदानाशिवाय भात बियाण्यांचे दर
बियाणे किलो दर
कर्जत-९, आर-२४ ४०
कर्जत-२, जया ३८
कर्जत-७ ३४
इंद्रायणी ५०
भोगावती, फुले समृद्धी, ४८
एचएमटी
भुईमुगाचे
बुकिंगच नाही
जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्र मोठे आहे; पण गेल्या दोन वर्षांपासून महाबीजकडे भुईमूग बियाण्याची मागणीच शेतकरी करीत नाही. बहुतांशी शेतकरी स्वत:कडीलच बियाणे वापरत आहेत.
३९ हजार टन खत उपलब्ध
खरिपासाठी १ लाख ४४ हजार ८८० टन खत मंजूर आहे. आतापर्यंत ३९ हजार टनांची आवक झाली असून, यंदा खताची टंचाई भासणार नसल्याचा अंदाज आहे.