‘दरडींच्या खिंडी’त अडकले महाबळेश्वर!
By Admin | Updated: August 5, 2014 23:40 IST2014-08-05T21:27:50+5:302014-08-05T23:40:43+5:30
सत्र सुरूच : अंबेनळी, पसरणी, केळघर घाटात कोसळली दरड

‘दरडींच्या खिंडी’त अडकले महाबळेश्वर!
सचिन काकडे -- सातारा महाबळेश्वरला येण्यासाठी पसरणी, केळघर आणि अंबेनळी असे तीन घाट आहेत. पावसाळ्यात कोणत्या न कोणत्या घाटात दरवर्षी दरड कोसळत असते; परंतु यावर्षी चक्क तिन्ही घाटांमध्ये दरड कोसळण्याचे सत्र सुरू असून याचा महाबळेश्वरच्या पर्यटन व दळणवळणावर परिणाम होत आहे. त्यामुळे दरडींच्या खिंडीत अडकले महाबळेश्वर असे म्हणण्याची वेळ आली आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर मान्सूनने जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच आपला रुद्रावतार प्रकट केला, तो अद्याप सुरूच आहे. बारमाही हंगाम असल्याने दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. महाबळेश्वरला येण्यासाठी पसरणी, केळघर आणि अंबेनळी असे तीन घाट आहेत. वाई-पाचगणी मार्गावर असणारा वाई घाट वगळता तर अन्य दोन्ही घाट वाहतुकीसाठी धोकादायक मानले जातात. अरुंद रस्ता, चढ-उतार आणि नागमोडी वळणे यामुळे या घाटांत सतत लहान-मोठे अपघात होत असतात. पावसाळा सुरू होताच दरवर्षी कोणत्या न कोणत्या घाटामध्ये दरड कोसळत असते; परंतु यावर्षी चक्क तिन्ही घाटामंध्ये दरड कोसळली आहे. हे सत्र सुरू असून याचा महाबळेश्वरच्या दळण-वळण आणि पर्यटनावर परिणाम होत आहे. कोकणातून येणारे बहुतांश पर्यटक हे अंबेनळी घाटातून महाबळेश्वरला येतात. या मार्गावर एसटी वाहतूक नेहमी सुरू असते. सोमवारी अंबेनळी घाटात दरड कोसळ्याने एसटीसह सर्व वाहतूक दोन दिवस बंद होती. काही दिवसांपूर्वी मेढा-महाबळेश्वर दरम्यान असणाऱ्या केळघर घाटात दरड कोसळली होती. याठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याने पर्यटक व अन्य वाहन चालकांनी पर्याय म्हणून पसरणी घाटातून जाणे पसंत केले; परंतु याच दिवशी पसरणी घाटात देखील दरड कोसळली. परिणामी सर्वप्रकारची वाहतूक ठप्प झाल्याने याचा महाबळेश्वरच्या व्यापार, व्यवसाय, दळण-वळण अशा सर्वच गोष्टींवर प्रतिकूल परिणाम झाला. यावर्षी तिन्ही घाटांत दरडी कोसळण्याची बहुतांश ही पहिंलीच वेळ आहे. केळघर अथवा वाई घाटाची सद्यस्थिती पाहिली तर दोन्हीं ठिकाणी डोंगर उतारावर वृक्षांचे प्रमाण अत्यल्प आहे. डोंगरउतारावर वृक्षांमुळे मातीचे वहन थांबविले जाते. वृक्षांच्या मुळ्यांमुळे जमीन एकमेकांत घट्ट चिकटून राहते. त्यामुळे पावसाळ्यात भूस्खलन अथवा दरडी कोसळण्यासारख्या घटनांवर नियंत्रण येते. मात्र वृक्षच नसतील तर अशा घटना सतत घडत असतात. आणि हेच कारण सध्या या नैसर्गिक आपत्तींना कारणीभूत ठरत आहे. - सुशील झाडे पर्यावरणपे्रमी, महाबळेश्वर सरासरी न गाठताही आपत्ती -महाबळेश्वरला गत वर्षाच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. -जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर येथे जुलै महिन्यात पावसाला सुरूवात झाली. -३१ जुलै रोजी येथे सर्वाधिक ४३२ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. -यंदा पाच आॅगस्टपर्यंत एकूण ३९६६.३ मिमी तर गेल्या वर्षी याच दिवशी ५२३५ मिमी पावसाची नोंद महाबळेश्वरला झाली होती. -गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस होऊनही दरडी कोसळतात, याला कारण वृक्षतोड हीच असल्याचा आरोपही पर्यावरणपे्रमींकडून केला जात आहे. -पाचगणी-वाई दरम्यान असणाऱ्या पसरणी घाटातून सतत वाहतूक सुरू असते. दररोज शेकडो महाविद्यालयीन युवक या घाटातून मोटरसायकलींवर ये-जा करीत असतात. पाचगणीहून वाईकडे जाताना पूर्ण उतार असल्यामुळे काही युवक पेट्रोलची बचत करण्यासाठी गाडी बंद करुन प्रवास करतात. ४काही वेळेस खासगी वाहतूक करणारी वाहने देखील पेट्रोल बचतीसाठी ही पद्धत अवलंबतात. ४पावसामध्ये वाहनांचे आॅइल रस्त्यावर सांडल्याने रस्ते चिकट होतात. त्यामुळे वळणांवर वाहने स्लिप होऊन अपघाताची शक्यता निर्माण होते. अशा वेळी वाहनांवर नियंत्रण आणने देखील कठीण बनते. ४घाटात पेट्रोल बचत करणे धोक्याचे ठरत आहे. याकडे सर्वांनी गांर्भियाने लक्ष देणे गरजेचे आहे.