शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘भोगावती शिक्षण’च्या निवडणुकीत महाआघाडी विजयी

By admin | Updated: August 31, 2016 00:36 IST

मोठ्या फरकाने विजय : विरोधी भाजप-रिपाइं आघाडीने जाणवून दिले स्वत:चे अस्तित्व, आता कारखान्याचं बाकी मैदान...

भोगावती : अनेक न्याय प्रक्रियेनंतर अखेर भोगावती शिक्षण मंडळाची ही पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना, स्वाभिमानी संघटना, जनता दल यांनी संयुक्त स्थापन केलेल्या महाआघाडीने सर्व १३ जागांवर विजय मिळविला. विरोधी भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन (आठवले) गटाने आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून दिली. भाजपने मिळविलेल्या मतांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करायला लावण्याची वेळ आणली. भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूक म्हणजे साखर कारखान्याला लाजवेल, अशाप्रकारे झाली. रविवारी (दि. २८) मतदान झाल्यानंतर सोमवारी लगेचच मतमोजणी घेण्यात आली. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, ती मंगळवारी (दि. २९) पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चालली. सायंकाळी सात-आठ पर्यंतच्या निकालातच महाआघाडीने सर्व जागांवर वर्चस्व घेतले होते. एकूण १९ हजार ५८९ मतांपैकी ८ हजार २१४ मते फुटीर होती. या मतांची संख्या लक्षणीय राहिल्यामुळे सर्वच उमेदवारांत अगदी शेवटपर्यंत घालमेल सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी शिवराज नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत योग्य प्रकारे प्रक्रिया सुरू राहिली आणि अगदी सुरुवातीपासून निकाल जाहीर होईपर्यंत कोणतेही गालबोट न लागता प्रक्रिया पार पडली.भोगावती विकास आघाडी - बळवंत चौगले - कुडुत्री (४९८३), दिलीप कांबळे - कोथळी (४९७९), गजाननराव पाटील - कुरुकली (५०७०), कृष्णा पाटील- वाशी (४७८३), महिपती पाटील - देवाळे (४८६१), सतीश पाटील - कुर्डू (५१०२), प्रा. शहाजी कांबळे - राशिवडे बु।। (५१४२), शामराव गुळवणी - गुडाळ (४७२२), सुभाष जाधव - शिरगाव (५४०१), सुनील रणदिवे - राशिवडे बु।। (५४११), उत्तम तुरंबेकर - पुंगाव (४४०२), विलास जाधव - क।। तारळे (४८८४), विष्णुपंत भाटले - शिरसे (४१५२). अपक्ष सात उमेदवार लढले होते. त्यामध्ये तोडणी-ओढणी कामगारांचे अध्यक्ष आबासाहेब चौगले - कुडुत्री यांनी १२५९ मते घेतली, तर मनसेचे अधिकृत रेल्वे इंजिन चिन्हावर लढलेले उत्तम चव्हाण यांनी ९१६ मते घेऊन ताकद दाखवून दिली आहे. (वार्ताहर)