मडिलगे, फराकटेवाडी, ससेगाव ‘भारी’
By Admin | Updated: January 14, 2016 00:28 IST2016-01-14T00:28:45+5:302016-01-14T00:28:45+5:30
ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार : शाळा, अंगणवाडी, कुटुंब कल्याणसाठी निवड

मडिलगे, फराकटेवाडी, ससेगाव ‘भारी’
कोल्हापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यांतील तीन ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. त्यामध्ये मडिलगे, फराकटेवाडी, ससेगावचा समावेश आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ, शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती विकास, शाळा, अंगणवाडी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय तपासणीत गोंदियाच्या जिल्हा परिषदेने मूल्यमापन केले होते. स्पर्धेमध्ये जिल्ह्णातील तीन ग्रामपंचायतींची निवड केली आहे. प्रथम दोन क्रमांक मिळालेल्या ग्रामपंचायती या विभागीय स्तरावरील स्पर्धेस पात्र ठरल्या आहेत. ‘स्वच्छतेचा महामंत्र’ पोहोचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने रोख रक्कम स्वरुपात बक्षिसे देऊन या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती व मिळालेला क्रमांक असा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेअंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायतीस प्रथम, हातकणंगले व कागल तालुक्यातील किणी व फराकटेवाडी ग्रामपंचायतींना द्वितीय (विभागून), करवीर तालुक्यातील बहिरेश्वर-मडिलगे ग्रामपंचायतीस तृतीय (विभागून) क्रमांक मिळाले. शाहू, फुले, आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती स्पर्धेअंतर्गत जिल्हा स्तरावर निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीत हातकणंगले तालुक्यातील किणी ग्रामपंचायतीस प्रथम, करवीरमधील उचगाव ग्रामपंचायतीस द्वितीय, राधानगरीतील कपिलेश्वर ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांक मिळाला. (प्रतिनिधी)
प्रथम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती
४सानेगुरुजी स्वच्छ शाळा : मडिलगे (ता. आजरा) ग्रामपंचायतीस
प्रथम क्रमांक.
४सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी : फराकटेवाडी (ता. कागल)
४कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत स्व. आबासाहेब खेडकर उत्कृष्ट कामासाठी पुरस्कार : ससेगाव (ता.शाहूवाडी)
४स्वर्गीय वसंतराव नाईक पाणी-सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार : धरणगुत्ती (ता. शिरोळ)
४सामाजिक एकता बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : उचगाव (ता. करवीर)