मा. शा. पाटील यांनी घेतला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:07+5:302021-01-08T05:21:07+5:30

कोल्हापूर : पोलीस उपअधीक्षकपदी पद्दोन्नती झालेले मा. शा. पाटील यांनी कोल्हापुरात विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात वाचक उपअधीक्षक पदाची सूत्रे ...

Ma. Sha. Patil took charge | मा. शा. पाटील यांनी घेतला पदभार

मा. शा. पाटील यांनी घेतला पदभार

कोल्हापूर : पोलीस उपअधीक्षकपदी पद्दोन्नती झालेले मा. शा. पाटील यांनी कोल्हापुरात विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात वाचक उपअधीक्षक पदाची सूत्रे बुधवारी सायंकाळी हाती घेतली.

कोल्हापूर जिल्ह्यात २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राजारामपुरी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदाची धुरा सांभाळली. सध्या रायगड येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना, त्यांना पोलीस उपअधीक्षकपदी पद्दोन्नती मिळाली. त्यांची बदली कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात वाचक पदावर झाली. त्यानुसार त्यांनी बुधवारी पद्‌भार स्वीकारला.

फोटो नं. ०६०१२०२१-कोल-एम.एस.पाटील (डीवायएसपी)

दरम्यान, जिल्ह्याशी संबंधित असणारे राज्य गुप्त वार्ता विभाग, कोल्हापूर येथील अपर उप-आयुक्त यशवंत केडगे यांची वाशीम येथील मंगरूळपीर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी बदली झाली. याबाबतचे आदेश गृह विभागाकडून जारी झाले.

Web Title: Ma. Sha. Patil took charge