शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त दागिन्यांचे आमिष; ३० लाखांचा गंडा, कोल्हापुरातील महिलेस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:22 IST

मायलेकाने केली फसवणूक,

कोल्हापूर : तीन किलो सोने खरेदी करण्यासाठी थोडे पैसे कमी पडत आहेत. दोन महिन्यांसाठी पैशांची मदत करा. त्याबदल्यात चांगला परतावा आणि कमी किमतीत सोने देतो, असे सांगून मायलेकाने शिवाजी पेठेतील महिलेस ३० लाखांचा गंडा घातला. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या काळात घडला.याबाबत अनिता नंदकुमार सूर्यवंशी (वय ५८, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) या महिलेने बुधवारी (दि. ६) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जयश्री मोहन माजगावकर (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) हिच्यावर गुन्हा दाखल केला. तिला बुधवारी (दि. ६) अटक केले. जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अनिता सूर्यवंशी आणि अटकेतील महिला जयश्री माजगावकर यांची तोंडओळख होती. त्याच ओळखीतून माजगावकर हिने सूर्यवंशी यांच्याकडे सोने खरेदीसाठी पैशांची मागणी केली. तिने मुलाच्या मदतीने २० लाख ४५ हजारांची रोकड आणि ९ लाख १५ हजार रुपये किमतीचे ३० तोळे दागिने घेतले. दोन महिन्यांनंतर सूर्यवंशी यांनी पैसे परत मागितले. मात्र, माजगावकर हिने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार मागूनही पैसे आणि दागिने परत मिळत नसल्याने अखेर सूर्यवंशी यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने माजगावकर हिला अटक केली.चांगल्या परताव्याचे आमिषसोने खरेदी-विक्रीचा व्यवहार करीत असल्याचे सांगून चांगला परतावा आणि कमी किमतीत दागिने देण्याचे आमिष माजगावकर हिने दाखवले होते. याच आमिषाला भुलून सूर्यवंशी यांनी रोकड आणि स्वत:कडील दागिनेही दिले. मात्र, पैसे आणि दागिनेही अडकून पडल्याने त्यांची फसवणूक झाली.