शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पिस्तुलचा धाक दाखवून सराफाच्या घरात लूटमार, खुनातील आरोपीसह तिघांना अटक

By उद्धव गोडसे | Updated: April 11, 2024 16:02 IST

रोख रक्कमेसह चांदीचे दागिने लंपास

कोल्हापूर : पिस्तूल आणि गुप्तीचा धाक दाखवून तिघांनी मंगळवार पेठे येथील पुण्यपवित्र सोसायटीतील धर्मेद्र केसरीमल ओसवाल यांच्या फ्लॅटमध्ये घुसून लूटमार केली. हा प्रकार बुधवारी (दि. १०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. संशयितांनी रोख रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास केले. ओसवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास तिन्ही संशयितांना अटक केली. महादेव उर्फ हणमंत मसगोंडा कुलगुटगी (वय ४७,  रा. पाचगाव, ता. करवीर), युनूस हसनसाब मुलतानी (वय २८,  रा. शिंदेनगर, निपाणी), धैर्यशील संभाजी सुतार (वय २५, रा. परिते, ता. करवीर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील महादेव हा २०१३ साली पाचगाव येथे झालेल्या एका खुनाची संशयीत आरोपी असून सध्या तो पॅरोलवर बाहेर आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, चांदीचे व्यापारी धर्मेद्र केसरीमल ओसवाल हे मंगळवार पेठेतील पुण्यपवित्र सोसायटीत फ्लॅट नंबर ४०२ मध्ये राहतात. बुधवारी रात्री नऊ वाजता ते त्यांची पत्नी आणि दुकानातील कामगार घरात होते. यावेळी संशयीत महादेव कलगुटकी व त्याचे दोघे साथीदार हातात गावठी बनावटीचे पिस्तुल, गुप्ती घेऊन घरात घुसले. त्यांनी ओसवाल व त्यांच्या कामगाराला मारहाण केली. त्यानंतर ओसवाल यांच्या अंगावर पिस्तुल रोखले, त्यांच्या पत्नील गुप्तीचा धाक दाखवत ओसवाल यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच देव्हाऱ्यातील २० ग्रॅम चांदीचे निरंजन असा चार हजार रुपयांचा मुदद्देमाल घेऊन पलायन केले.

ओसवाल यांनी तातडीने जुना राजवाडा पोलीसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ओसवाल यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महादेव कलगुटकी याच्यासह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मुदद्देमाल व पिस्तुल,गुप्ती जप्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस