शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:12 IST

महामार्गावर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा बोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ठळक मुद्देमहामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंदएका युवकासह दोन अल्पवयीन मुले ताब्यात; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा : महामार्गावर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा बोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.अनिकेत चंद्रकांत जाधव (वय १९, रा.सदर बझार सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, टेम्पो चालक रेहमान नदाफ (रा. संजयनगर, सांगली) हा १९ मे रोजी टेम्पोने पुण्याहून सांगलीकडे शेतीची औषधे घेऊन निघाला होता. यावेळी रात्री आठच्या सुमारास बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत तो लघुशंकेसाठी थांबला होता. त्यानंतर काही वेळात तो पुन्हा ट्रकमध्ये बसला असता तेथे दुचाकीवरून तीन युवक आले.

टेम्पोला दुचाकी आडवी मारून त्यांनी चालकाकडे पैसे मागण्यास सुरूवात केली. चालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांपैकी एकाने रेहमान नदाफ याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्यांच्याकडील सहा हजारांची रोकड आणि मोबाइल घेऊन त्यांनी पलायन केले होते.

या प्रकारानंतर सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी या टोळीचा छडा लावण्यासाठी ठिकठिकाणी पथके पाठविली. दरम्यान, शुक्रवारी रात्री हे तिघे पुन्हा बोरगाव गावच्या हद्दीत येणार असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. तिघेही दुचाकीवरून येत असताना पोलिसांनी एकावर झडप घातली मात्र, दोघेजण पळून गेले. पकडलेल्या अनिकेत जाधव याच्याकडून अन्य दोघांची माहिती पोलिसांनी घेतली. त्यानंतर संबंधित दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघेही अल्पवयीन असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.या टोळीने यापूर्वी महामार्गावर आणखी कोठे, दरोडा टाकला आहे का, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, विजय साळुंखे, किरण निकम, राहुल भोये यांनी या कारवाईत भाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस