शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा डोंगरावर पार्किंगमधून लूट, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 17:27 IST

बेळगाव येथील एका शाळेची सहल घेऊन आलेल्यांना हा अनुभव आला. त्याचा त्यांनी केलेला व्हिडीओ संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

कोल्हापूर : जोतिबा डोंगरावर पार्किंगच्या नावावर लूट असल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. तसेच ठेकेदाराचे कर्मचारी दादागिरी करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. बेळगाव येथील एका शाळेची सहल घेऊन आलेल्यांना हा अनुभव आला. त्याचा त्यांनी केलेला व्हिडीओ संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.बेळगावहून २५ विद्यार्थ्यांना घेऊन एक टेम्पो ट्रॅव्हलर जोतिबा दर्शनासाठी आला होता. यावेळी चालकाकडे २०० रुपयांची मागणी करण्यात आली. यावेळी कशाचे दोनशे रुपये अशी विचारणा केल्यानंतर २५ मुलांचे १२५ रुपये ग्रामपंचायत कराचे म्हणून सांगण्यात आले. तर ७५ रुपये पार्किंगचे म्हणूनही सांगण्यात आले; परंतु याचा उल्लेख पावतीमध्ये नाही असे चालक सांगत होता. यावरून कर्मचारी आणि त्याच्यात वादही झाला.नंतर त्याने दुसऱ्याला बोलावून घेतले. त्यावेळी चित्रीकरण करणाऱ्या बेळगावहून आलेल्या व्यक्तीचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित व्यक्तीने मी वाहतूक सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे असे सांगून सर्व मुलांना खाली उतरवून रस्त्यावर बसवण्याचा इशारा दिला. हे सर्व चित्रीकरण झाल्याचा व्हिडीओ संध्याकाळपर्यंत सर्वत्र व्हायरल झाला. जोतिबावर नेहमीच या सर्वांची दादागिरी असल्याच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या. अशांमुळे जोतिबा देवस्थानची, कोल्हापूरची बदनामी होत असल्याच्याही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या आहेत.जिल्हा परिषद काय करणारजोतिबा ग्रामपंचायत ही जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते. त्यामुळे जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग हा व्हिडीओची दखल घेऊन काही चौकशी करणार का अशी विचारणा होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba TempleजोतिबाParkingपार्किंग