अंगावर खाजेची पावडर टाकून जयसिंगपुरात लुटले सव्वा लाख

By Admin | Updated: July 13, 2014 00:42 IST2014-07-13T00:40:08+5:302014-07-13T00:42:29+5:30

जयसिंगपूर : अंगावर खाज उठण्याची पावडर टाकून मोपेडच्या डिक्कीतील एक लाख २० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज, शनिवारी भर दुपारी शहरात घडली.

Looted Savaiva lakhs in Jayshpur | अंगावर खाजेची पावडर टाकून जयसिंगपुरात लुटले सव्वा लाख

अंगावर खाजेची पावडर टाकून जयसिंगपुरात लुटले सव्वा लाख

जयसिंगपूर : अंगावर खाज उठण्याची पावडर टाकून मोपेडच्या डिक्कीतील एक लाख २० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज, शनिवारी भर दुपारी शहरात घडली. नवव्या गल्लीत भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाळासाहेब शंकर देवाळे (वय ६१, रा. शाहूनगर, जयसिंगपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
शहरातील नवव्या गल्लीत असणाऱ्या गडहिंग्लज अर्बन बॅँकेतून बाळासाहेब देवाळे यांनी १ लाख २० हजार काढले होते. ही रक्कम अ‍ॅक्टिव्हा मोपेड (एमएच १० एडी ८७८२)च्या डिक्कीत ठेवली होती. मोपेडचे चाक पंक्चर झाल्यामुळे देवाळे हे विजय टायर्स वर्क्स येथे थांबले होते. यावेळी पाळत ठेवलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अंगावर खाज उठण्याची पावडर टाकली. तेथेच थोड्या अंतरावर देवाळे हे पाणी पिण्यास गेले असता मोटारसायकलवरील एका चोरट्याने मोपेडची डिक्की उघडून त्यातील पैसे ठेवलेली कॅरिबॅग घेऊन पोबारा केला. दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, अधिक तपास सहायक फौजदार ए. एस. माने करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Looted Savaiva lakhs in Jayshpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.