शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

Maharashtra Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांतही नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:05 IST

कोल्हापूर महापालिकेतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस - शिवसेना आणि ताराराणी आघाडी - भाजप नगरसेवकांत गेल्या चार वर्षांपासून असलेली एकजूट विधानसभेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता धूसर आहे.

ठळक मुद्देआधी ‘दक्षिण’चं बघा; मग ‘उत्तर’कडे बघूयाराष्ट्रवादीच्या नगरसेवकांतही नाराजीचा सूर

कोल्हापूर : महापालिकेतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस - शिवसेना आणि ताराराणी आघाडी - भाजप नगरसेवकांत गेल्या चार वर्षांपासून असलेली एकजूट विधानसभेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता धूसर आहे.

नगरसेवकांवरील पक्षनेतृत्वाचे सुटलेले नियंत्रण, मागच्या निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यानंतरही कारवाई करण्यात आलेले अपयश यांमुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक नगरसेवक आपली स्वतंत्र भूमिका ठरविण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे.महापालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी -शिवसेना यांची आघाडी सत्तेत आहे, तर ताराराणी-भाजप विरोधात आहेत. गेल्या चार वर्षांत सत्तारूढ आणि विरोधी आघाडीत कमालीची चुरस तसेच एकजूट दिसून आली. भाजपबरोबर शिवसेनेची राज्यात युती झाली तेव्हा महापालिकेत महापौरपदाची निवडणूक लागली होती.

त्यावेळी चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी भाजपकडून महापौरपदाच्या उमेदवार होत्या. तेव्हा शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी पाठिंबा द्यावा म्हणून बरेच प्रयत्न झाले. तेव्हा शिवसेनेच्या नगरसेवकांनी कॉँग्रेससोबत राहून एकजुटीचे प्रदर्शन घडविले.सगळ्यांत मोठी गोची ताराराणी आघाडीची झाली आहे. आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी मागची निवडणूक राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात लढविली होती; तर आघाडीच्या नेत्यांचे आमदार सतेज पाटील म्हणजेच कॉँग्रेसबरोबर राजकीय वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे ‘उत्तर’मधून कोणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. म्हणूनच ‘ताराराणी’च्या सर्व नगरसेवकांना ‘आधी दक्षिणचं बघा, मग उत्तरकडे बघूया’ असे निरोप देण्यात आले आहेत. उत्तरेत कोणाला मदत करायची, याचा निर्णय आघाडीने प्रलंबित ठेवला आहे.भाजपच्या नगरसेवकांतील एकजूट यावेळी मोडकळीस येण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेना युती झाली असली तरी राजेश क्षीरसागर यांनी गेल्या काही दिवसांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात भूमिका घेऊन त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती. महापौर निवडणुकीतही त्यांनी विरोधाची भूमिका घेतली. त्यामुळे आता आम्ही का त्यांचा प्रचार करायचा? असे म्हणत भाजपचे नगरसेवक नाराज असल्याचे दिसत आहे.राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचीही हीच अवस्था आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांचा कॉँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या उमेदवारीवरच आक्षेप आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा सगळ्या शहरभर त्यांचे डिजिटल फलक लावण्यात जाधवच आघाडीवर होते.

गेली चार वर्षे भाजपचे कार्यकर्ते म्हणून मिरविणाऱ्या आणि घरात दोन नगरसेवक असलेल्या जाधवांसाठी आम्ही मते कशी मागायची, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी उत्तरेत शिवसेनेचा तर दक्षिणेत भाजपचा प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे निवडणूक १० दिवसांवर येऊन ठेपली असतानाही नगरसेवक प्रचारापासून अलिप्त असल्याचे पाहायला मिळत आहे. कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे १४, ताराराणी आघाडीचे १९, भाजपचे १४, तर शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर