शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

दर्शनाची ओढ, मनामनात विठूनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST

कोल्हापूर : टाळ-मृदंगाचा नादब्रह्म, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, नामदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय..., विठ्ठल-विठ्ठल जयहरी विठ्ठलचा गजर करत ...

कोल्हापूर : टाळ-मृदंगाचा नादब्रह्म, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, नामदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय..., विठ्ठल-विठ्ठल जयहरी विठ्ठलचा गजर करत मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर-नंदवाळ दिंडीने सजवलेल्या केएमटी बसमधून नंदवाळला प्रस्थान केले. दुसरीकडे दोन वारी गेल्या आषाढी कोरड्या, दिंड्या झाल्या मूक नाही टाळघोष, मृदंग अबोल माऊलीचा, तुझ्या भेटी जीव आसुसला, सोड आता वीट, झालो कासावीस, घे मला मिठीत पांडुरंगा... विठ्ठल भेटीचा असा आर्त भाव मनात ठेवून स्टेटसपासून डीपीपर्यंत विठ्ठलाचा जयघोष करत कोल्हापूरकरांनी घरातूनच माऊलीला नमस्कार केला.

आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेचे प्रतीक. विठ्ठलाच्या ओढीने टाळ-मृदंग आणि हरी नामाचा गजर करत मैलोनमैल प्रवास करणारे वारकरी, बहुजनांना आपल्या मायेच्या कवेत सामावून घेणाऱ्या विठ्ठलाचा वर्षातील सर्वात मोठा सोहळा; पण सलग दुसऱ्यावर्षी कोरोनामुळे तिकडे पंढरीची वारी थांबली आणि इतके कोल्हापूर-नंदवाळ ही पायी दिंडीदेखील वाहनातून न्यावी लागली. सकाळी ८ वाजता विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव देशमुख, महालक्ष्मी कॅलेन्डरचे रणवीर शिर्के, ऋतुराज क्षीरसागर यांच्याहस्ते आरती झाली. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, विश्व हिंदू परिषदेचे ॲड. रणजितसिंह घाटगे यांच्याहस्ते माऊलींच्या अश्वाचे पूजन झाले. दिंडीप्रमुख ह. भ. प आनंदराव लाड महाराज व बाळासाहेब पवार, ॲड. राजेंद्र किंकर, वासुदेव संभाजी पाटील यांनी मान्यवरांना श्रीफळ आणि तुळस हार देऊन सत्कार केला.

वारीची परंपरा जपत टाळ-मृदंगाचा गजर, फुगड्या घालून, भजन, अभंग म्हणत काही पावले माऊलींची पालखी पायी नेण्यात आली. त्यानंतर पुढे फुलांनी सजवलेल्या केएमटीमध्ये पालखी ठेवण्यात आली आणि कोल्हापूर ते नंदवाळ वारीला सुरुवात झाली. वाटेवर बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारुती चौक आणि खंडोबा देवालय येथे भाविकांनी पालखी असलेल्या केएमटीवर फुलांची उधळण केली. उभा मारुती चौकात सायबा ग्रुपच्यावतीने वारकरी बंधूंना चहा व फराळ देण्यात आला. या सोहळ्यासाठी संस्थापक-संचालक दीपक गौड, संतोष कुलकर्णी, राजेंद्र मकोटे, संभाजी पाटील, गंगाधर दास, ह.भ.प एम. पी. पाटील, संतोष रांगोळे तसेच श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा, भक्त मंडळ व जयशिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळ, राध्येय ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .

---

विठ्ठल मंदिरात धार्मिक विधी

कोरोनामुळे सगळी विठ्ठल मंदिरे बंद असल्याने सलग दुसऱ्यावर्षी कोल्हापूरकरांना घरातूनच विठ्ठलाला नमस्कार करावा लागला. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिराच्या बाह्य परिसरात विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विठ्ठल रूपात पूजा बांधण्यात आली होती, तर परिसरातील विठ्ठल मंदिरांतदेखील सकाळी अभिषेक, आरती असे धार्मिक विधी करण्यात आले. मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात विशेष पूजा बांधण्यात आली होती. मंगळवारी पावसाने उघडीपच दिली नाही, त्यामुळे भाविकांना मंदिराबाहेरूनही देवाचे दर्शन घेता आले नाही. दरम्यान, घराघरात वरीचा भात, खिचडी, फळे, शेंगदाणा, राजगिऱ्याचे लाडू अशा उपवासाच्या पदार्थांची रेलचेल होती..

--

स्टेटसपासून डीपीपर्यंत विठू माऊली...

आषाढी एकादशीमुळे कोरोनाचे अस्वस्थ वातावरण निवळण्यास मदत झाली. नागरिकांसह बाजारपेठेतही उत्साह होता. प्रत्यक्ष देवाचे दर्शन घेता आले नाही, तरी सगळ्यांनी फेसबुक पेज, स्टेटस, डीपीमधून समाजमाध्यमांवर विठूमाऊलीचा गजर केला. विठ्ठलाचे छायाचित्र, अभंग, वारीचे व्हिडिओ, संतांच्या रचना आणि आताच्या कोविडमुळे उद्भवलेली परिस्थिती यावर भाष्य करून हे वातावरण निवळू दे... पुढच्यावर्षी तुझी भेट घडू दे, अशी आळवणी करण्यात आली.

---

फोटो फाईल स्वतंत्र पाठवली आहे.