‘कोजिमाशि’साठी दुरंगी लढत
By Admin | Updated: April 8, 2015 00:58 IST2015-04-08T00:58:05+5:302015-04-08T00:58:19+5:30
स्वाभिमानी सहकार आघाडी -

‘कोजिमाशि’साठी दुरंगी लढत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेत (कोजिमाशि) सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडी व शाहू परिवर्तन महाआघाडीत सामना रंगणार आहे. २१ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात राहिले असून, अटीतटीची दुरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. मतदान १९ एप्रिलला होत असून, २० एप्रिलला मतमोजणी आहे. ‘कोजिमाशि’साठी २३५ अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने माघारीसाठी झुंबड उडाली होती. २३५ तब्बल १८३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे २१ जागांसाठी ५२ जण रिंगणात राहिले आहेत. सत्तारूढ स्वाभिमानी आघाडीच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले होते पण जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत ताणला होता. एका जागेसाठी सकाळी अकरापर्यंत महाआघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या अखेर दुपारी दोन वाजता तिढा सुटून ‘महाआघाडी’ची घोषणा करण्यात आली. महाआघाडीमध्ये विद्यमान संचालक संजय पाटील व माजी संचालक राजेंद्र रानमाळे व शहाजी पाटील यांना संधी देण्यात आली आहे. उर्वरित नवीन चेहऱ्यांना संधी देऊन त्यांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तारूढ आघाडीने नवीन चेहरे देऊन तगडे पॅनेल देण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वाभिमानी सहकार आघाडी -
सर्वसाधारण गट - आनंदराव काटकर, गौतम पाटील, लक्ष्मण डेळेकर, धोंडिराम बाबर, रावसाहेब कारंडे, संजय जाधव, समीर घोरपडे, सुभाष पाटील, कृष्णात खाडे, संदीप पाटील, कृष्णात पाटील, रामचंद्र हालके, संजय डवर, शांताराम तौंदकर, हिंदुराव पाटील, सदाशिव देसाई.
महिला - संगीता मांगलेकर, अंजली जाधव.
अनूसुचित जाती - अनिल चव्हाण
इतर मागासवर्गीय - कैलास सुतार
भटक्या विमुक्त - गंगाराम हजारे
राजर्षी शाहू परिवर्तन महाआघाडी -
सर्वसाधारण गट - राजेंद्र रानमाळे, राजाराम बरगे, सुरेश खोत, अविनाश चौगुले, शामराव पाटील, शिवाजी खराडे, अरविंद किल्लेदार, शहाजी पाटील, बबन इंदूलकर, रवींद्र देसाई, सुरेश कोळी, संजय पाटील, महादेव पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, राजगोंडा झुणके.
महिला - पुष्पलता चोपडे, सुलोचना कोळी
अनूसुचित जाती - अशोक पलंगे
भटक्या विमुक्त - बाळकृष्ण गिरीबुवा
इतर मागासवर्गीय - प्रधान पाटील.