शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकसेवा’ प्रकल्प कोल्हापुरात राबविणार, मंत्री शंभूराज देसाई यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 17:45 IST

आमदार प्रकाश आबिटकर यांनी लोकसेवा अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला

कोल्हापूर : राज्यातील नागरिकांना ठरलेल्या वेळेत लोकसेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम २०१५ तयार करण्यात आला. परंतु, याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबतचा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधिमंडळात उपस्थित केला. यावर उत्तर देताना ही ‘लोकसेवा’ देण्याचा पथदर्शी प्रकल्प कोल्हापूरपासून राबवण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समय उचित सेवा देण्याकरिता २८ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी करण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्षात या अधिनियमानुसार राज्यातील विभागांमध्ये कामकाज होत नसून नागरिकांना वेळेत लोकसेवा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. प्रामुख्याने तहसील, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी, पुनर्वसन, नगररचना, समाजकल्याण विभागासह बहुतांशी सर्वच विभागांमध्ये कामकाज करण्यास दिरंगाई होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, लोकसेवा हक्क अधिनियमाचा भंग करणारी आहे. यामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून वेळोवेळी दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत काय केले पाहिजे यासाठीच्या सूचनाही आबिटकर यांनी यावेळी मांडल्या.लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ज्या कार्यालयांमधून नागरिकांना सेवा देण्यास टाळाटाळ करण्यात येते हे चुकीचे आहे. याबाबत आमदारांच्या मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मुख्य सचिवांना सूचना देऊन त्यांच्यामार्फत सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या कायद्याप्रमाणे काम करण्याच्या सूचना देण्यात येणार असून, प्रत्येक महिन्याला अहवाल घेतला जाईल, असे स्पष्ट केले.या लक्षवेधीमध्ये आमदार अतुल भातखळकर, आमदार बच्चू कडू, आमदार जयंत पाटील यांनी सहभाग घेत अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबावणी करावी, अशी मागणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाPrakash abitkarप्रकाश आबिटकरShambhuraj Desaiशंभूराज देसाई