आंबेओहोळ प्रकल्पाचा जलपूजनाचा कार्यक्रम होणार लोकोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST2021-09-09T04:28:31+5:302021-09-09T04:28:31+5:30

रवींद्र येसादे उत्तूर : १६ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळालेला आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्प २२ वर्षांनंतर पूर्णत्वास आला ...

Lokotsav will be the water worship program of Ambeohol project | आंबेओहोळ प्रकल्पाचा जलपूजनाचा कार्यक्रम होणार लोकोत्सव

आंबेओहोळ प्रकल्पाचा जलपूजनाचा कार्यक्रम होणार लोकोत्सव

रवींद्र येसादे

उत्तूर : १६ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळालेला आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्प २२ वर्षांनंतर पूर्णत्वास आला आहे. लोकोत्सव ठरणाऱ्या या प्रकल्पाचा जलपूजन आज (गुरुवारी) होत आहे. यानिमित्त आंबेओहोळ प्रकल्पामुळे ३९२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सव्वा टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पात सध्या प्रकल्पात ८८ टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्प तुडुंब भरल्याने उत्तूर परिसरासह गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव, गिजवणे, शिप्पूर, लिंगनूर या परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कृती समितींची मतभिन्नता प्रशासकीय अडचणी, न्यायालयीन दाव्यांचा अडथळा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी होणारी आंदोलने, निधीसाठी नसणारी तरतूद अशा अनेक कारणांनी हा प्रकल्प रखडला.

तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने प्रकल्पाला मंजुरी मिळाली. परंतु, त्यांचे निधन आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आली.

बहुतांश प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सुटल्या, काही अंशी शिल्लक असणारे पुनर्वसन केल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. त्यांनी दिल्याने गेली दोन वर्षे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली अन् प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे गेले.

प्रकल्पाचे ३३.८४ चौ. कि. मी. इतके पाणलोट क्षेत्र आहे. ३५.११ द.ल.घ.मी. एकूण पाणीसाठा असणार आहे. उपयुक्त पाणीसाठा ३३.६३ द.ल.घ.मी. असणार आहे. आजरा तालुक्यातील १० तर गडहिंग्लज तालुक्यातील ११ गावांना पाण्याचा लाभ होणार आहे. १९६० मीटर मातीचे धरण व ८० मीटर सांडवा आहे. ०.५० मेगावॅट क्षमतेची विद्युतनिर्मिती होणार आहे. बांधकामावर ८४.८७ कोटी, भू-संपादन व पुनर्वसनासाठी ९९.७३ कोटी असा खर्च झाला आहे.

कोल्हापूर पद्धतीचे ७ बंधारे असून ६ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १४१ प्रकल्पग्रस्तांना कडगाव व लिंगनूर येथे भूखंड वाटप होणार आहेत. भू-संपादनासाठी ३४९.५० हेक्टर खासगी जमीन आवश्यक आहे. संबंधित क्षेत्र संपादनासाठी अंतिम निवाड्यानुसार मोबदला वाटप होऊन संपूर्ण ३७९.५० हेक्टर क्षेत्र जलसंपदाच्या ताब्यात आहे. एकूण ८१७ प्रकल्पग्रस्त असून ३५७ प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन स्वीकारले आहे. ४६० प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी पात्र आहेत. पूर्णत: जमीन वाटप झालेले ९३, अंशत: जमीन वाटप झालेले ३०, अंशत: पॅकेज वाटप करून पुनर्वसन झालेले ३६, आर्थिक पॅकेज वाटप करून पूर्णत: पुनर्वसन झालेले प्रकल्पग्रस्त २४६, पूर्णत: पुनर्वसन झालेले प्रकल्पग्रस्त ३७५, अशंत: पुनर्वसन पूर्ण झालेले पुनर्वसन प्रकल्पग्रस्त ३०, पूर्णत: पुनर्वसन न झालेले प्रकल्पग्रस्त ५५, पॅकेज प्रगतीत असणारे १२, पुनर्वसनास प्रतिसाद न दिलेले २८ जण आहेत. या प्रकल्पामुळे उत्तूर २२, आर्दाळ १३६, करपेवाडी १५, होन्याळी ८५, हालेवाडी ९३, महागोंड १९, वडकशिवाले १७ आदी शेतकऱ्यांच्या जमिनी बुडित क्षेत्रात गेल्या आहेत. तर आर्दाळ २५२, करपेवाडी १५३, उत्तूर ५१, हालेवाडी १७२, होन्याळी १६५, महागोंड ३०, वडकशिवाले ४५ इतके प्रकल्पग्रस्त बाधित झाले आहेत.

Web Title: Lokotsav will be the water worship program of Ambeohol project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.