लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST2021-07-29T04:26:16+5:302021-07-29T04:26:16+5:30
इचलकरंजी : कबनूर (ता.हातकणंगले) येथील घरमालकीन भाडेकरूला काढत नसल्याचा राग मनात धरून तिला व तिच्या अल्पवयीन मुलीला साखळी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कबनूर (ता.हातकणंगले) येथील घरमालकीन भाडेकरूला काढत नसल्याचा राग मनात धरून तिला व तिच्या अल्पवयीन मुलीला साखळी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याबाबत मंगळवारी (दि.२७) रात्री उशिरा एकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. कृष्णात गोते असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
घरमालकीण असलेल्या महिलेला तू तुझ्या भाडेकरूला काढून टाक म्हणून गोते हा सांगत होता. परंतु संबंधित महिलेने त्याचे ऐकले नाही. याचा राग मनात धरून कृष्णात व त्याच्या अल्पवयीन मुलाने महिलेला शिवीगाळ करून धमकी दिली. त्यावेळी त्यांची मुलगी शिवीगाळ करू नका, असे सांगताच कृष्णात याच्या मुलाने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.