शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

‘लोकमत महामॅरेथॉन’ काऊंटडाऊन सुरू; नोंदणीसाठी अखेरची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:30 IST

कोल्हापूर : आरोग्याबाबत सजग होण्याचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी होत आहे. त्याच्या ...

ठळक मुद्दे‘लोकमत महामॅरेथॉन’ काऊंटडाऊन सुरू; नोंदणीसाठी अखेरची लगबग सुरूधावपटूंना मिळणार रंगीत मेडल; कोल्हापुरातील तिसऱ्या पर्वाला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : आरोग्याबाबत सजग होण्याचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी होत आहे. त्याच्या नावनोंदणीसाठी धावपटू आणि कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. महामॅरेथॉनकरिता नावनोंदणी करण्यासाठी आता आज, शुक्रवारचा एकच दिवस उरला आहे. निराशा टाळण्यासाठी धावपटूंनी आजच नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा.या महामॅरेथॉनमध्ये वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना सहभागी होता येणार आहे. विविध पाच गटांमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. या वर्षी होणाऱ्या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य असून, त्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला आकर्षक आणि रंगीत मेडल मिळणार आहे. कोल्हापूरची नवी ओळख असणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन,’ १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे.

१८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे. सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल. सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधाया महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा. 

प्रकार (अर्ली बर्ड शुल्क) असे मिळणार साहित्य

  • ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये, टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये, टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये, टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये, टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये,  टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट

 

 

आरोग्याच्या दृष्टीने प्रेरणादायी उपक्रमविद्यार्थी-पालक यापैकी कोणाही व्यक्तींसाठी खेळ आणि व्यायाम ‘आरोग्यम धनसंपदा’ अर्थात आरोग्य चांगले असले तर धनदौलत मिळविता येते. मोठमोठी यशाची शिखरेही पादाक्रांत करता येतात. स्वप्नांचे यशामध्ये रूपांतर करता येते. ही किमया केवळ खेळ आणि व्यायामाद्वारे शक्य आहे; त्यामुळे ‘लोकमत महामॅरेथॉन’सारखे उपक्रम प्रेरणा देणारे आहेत. महामॅरेथॉन हा उपक्रम समाजाला शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सर्वोत्तम आहे.- प्रा. डॉ. भारत खराटे,विभागीय संचालक, चाटे शिक्षण समूह

शारीरिक तंदुरुस्तीसाठी स्तुत्यशील उपक्रमलोकमत समूहातर्फे आयोजित केलेला महामॅरेथॉन खेळाडूंसह सर्वांच्या शारीरिक तंदुरुस्तीकरिता सर्वोत्तम असा खेळ प्रकार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक व्यायाम हरवत चालले आहे. विशेषत: धावणे हा प्रकार सर्वांकरिता बहुपयोगी व्यायाम आहे. त्यातून शरीर तर तंदुरुस्त राहतेच, शिवाय मनही प्रसन्न राहते. अशा उपक्रमांच्या पाठीशी इंडियन आॅईल कॉर्पोरेशन सदैव कायम राहील. मी व माझ्यासह सर्व सहकारी या स्तुत्य उपक्रमात सहभागी होत असून, तुम्हीही मागे राहू नका, सहभागी व्हा.- चैतन्य ठक्कर, सहायक व्यवस्थापक,(ल्युबस-रिसेलर सेल्स) इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेड, कोल्हापूर

तणावमुक्तीसाठी धावणे गरजेचे‘लोकमत’च्या महामॅरेथॉनच्या सलग तिसऱ्या पर्वात मी व माझे सहकारी सहभागी होत आहोत. सध्याच्या धकाधकीच्या दुनियेत आरोग्य तंदुरुस्तीसाठी नित्य व्यायाम गरजेचा आहे. त्यात धावणे हा सहज कुठेही होऊ शकणारा व्यायाम आहे. लोकमतच्या स्तुत्य उपक्रमामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये मी व माझ्या अनेक सहकाºयांना धावण्याची आवड निर्माण झाली आहे; त्यामुळे तुम्हीही सहभागी होऊन मॅरेथॉन या चळवळीत सहभागी होऊन तंदुरुस्त राहा.- रौनक शहा, अध्यक्ष, (पश्चिम महाराष्ट्र) यंग जैन्स आॅफ इंडिया

 

 

टॅग्स :Robin Hood Armyराॅबिन हुड अार्मीkolhapurकोल्हापूर