शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

‘लोकमत महामॅरेथॉन’ : ‘प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स’चे १00 जण धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:32 AM

नववर्षात तंदुरुस्त राहा, असा संकल्प करत, आपल्या कर्मचारी व नातेवाईक अशा १00 जणांना घेऊन प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शीतल संघवी हे ६ जानेवारीला होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहेत. धावणे हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी चांगले असून, जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे व आपले आरोग्य उत्तमरीत्या जपावे, असे आवाहन त्यांनी कोल्हापूरकरांना केले आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत महामॅरेथॉन’ : ‘प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स’चे १00 जण धावणार नववर्षात तंदुरुस्तीचा संकल्प : नाव नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : नववर्षात तंदुरुस्त राहा, असा संकल्प करत, आपल्या कर्मचारी व नातेवाईक अशा १00 जणांना घेऊन प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शीतल संघवी हे ६ जानेवारीला होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहेत. धावणे हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी चांगले असून, जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे व आपले आरोग्य उत्तमरीत्या जपावे, असे आवाहन त्यांनी कोल्हापूरकरांना केले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडानगरी म्हणून गणल्या गेलेल्या करवीरमध्ये ६ जानेवारी २०१९ रोजी व्हिंटोजिनो प्रस्तूत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार रंगणार आहे. या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यानंतर धावपटू यात सहभागी होण्यासाठी आतुर झाले होते. त्याप्रमाणे राज्यातील धावपटंूसह सर्वसामान्य नागरिकांचाही नावनोंदणीकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

यामध्ये कोल्हापुरातील प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शीतल संघवी यांनी आपल्या कर्मचारी व नातेवाईक, मित्रमंडळीसमवेत नववर्षात मॅरेथॉनमध्ये धावण्याचा संकल्प केला आहे. धावणे हे आरोग्यासाठी चांगले असून, आपल्या कर्मचारी, नातेवाईक व मित्रमंडळींनी यामध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने संघवी यांनी हे पाऊल उचलले आहेत. त्यांनी ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये १० कि. मी. गटात १00 जणांची नोंदणी केली आहे.

महामॅरेथॉनसाठी गुरुवारपर्यंत नोंदणी‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धुमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. कोल्हापुरात गेल्यावर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्ध तंदुरुस्त राहावेत, या हेतूने यावर्षी आयोजित केलेली ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन ३ किलोमीटर अंतराची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे.त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनादेखील या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २० डिसेंबरपर्यंत आहे.

नावनोंदणीसाठी संपर्कया महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे.

 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathon 2018लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन २०१८kolhapurकोल्हापूर