शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महामॅरेथॉनचा कोल्हापुरात येत्या रविवारी थरार रंगणार, बारा लाखांपर्यंतची बक्षिसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 13:56 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद, नोंदणीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस

कोल्हापूर : कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी थंडीच्या हवामानामुळे राज्यासह परराज्यातील धावपटूंमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या लोकमत कोल्हापूर महामॅरेथाॅनच्या सातव्या पर्वाचे आयोजन रविवारी (दि.२८) करण्यात आले आहे. या महामॅरेथाॅनमध्ये सहभागी होण्यासाठी व्यावसायिक धावपटूंसह सर्वसामान्य आबालवृद्ध सहभागी होण्यासाठी आतूर आहेत. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. राज्यासह परराज्यातील व्यावसायिक धावपटूंनी नावनोंदणी करीत या महामॅरेथाॅनला विशेष पसंती दिली आहे.कोल्हापुरात कसबा बावडा पोलिस परेड मैदानातून रविवारी सकाळी पाच वाजता कोल्हापूर महामॅरेथाॅनला सुरुवात होणार आहे. सर्वच गटातील स्पर्धकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जसजशी महामॅरेथाॅनची तारीख जवळ येईल त्याप्रमाणे शहरासह ग्रामीण भागातील धावपटूंचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक क्रीडा संघटना, ग्रुप, महिला मंडळ, क्लब, असोसिएशन, संस्था, उद्योग, कारखाने आणि विद्यार्थ्यांनी नोंदणीला प्राधान्य दिले आहे.

अनेकांनी सहाव्या पर्वात नोंदणी फुल्ल झाल्याने निराशा होती. याची जाणीव ठेवून यंदाच्या सातव्या पर्वात नोंदणी सुरू झाल्यानंतर तत्काळ नोंदणी करून आपला सहभाग निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, मित्रमंडळींसह सहकुटुंब महामॅरेथाॅनचे बुकिंग केले आहे. बहुतांश फॅमिली रन करणारे ३ आणि ५ किलोमीटर शर्यतीत धावणार आहेत. तर, वैयक्तिक धावणारे हौशी व व्यावसायिक धावपटू १० आणि २१ किलोमीटरच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत.

बारा लाखांपर्यंतची बक्षिसेमॅरेथाॅनमध्ये २१ आणि १० किलोमीटरमधील विजेत्यांना वयोगटनिहाय एकूण मिळून १२ लाख रुपयांची बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. तर २, ५ किलोमीटरमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.शनिवारी एक्स्पोशनिवारी (दि.२७) पोलिस परेड मैदानाजवळील अलंकार हाॅलमध्ये ‘महामॅरेथाॅन एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धकांना बीब आणि गुडीबॅगचे वितरण केले जाणार आहे.

लोकमत महामॅरेथॉन उपक्रमात वारणा दूध संघ सहप्रायोजक म्हणून आहे. या सातव्या पर्वात आम्ही सर्व जण सहभागी झालो आहोत. आज प्रत्येकाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज व्यायाम आवश्यक आहे. ‘लोकमत’ने सुरू केलेला महामॅरेथॉन उपक्रम खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी या उपक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. -सुधीर कामेरीकर, अकौंटस मॅनेजर, वारणा दूध संघ, तात्यासाहेब कोरेनगर. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarathonमॅरेथॉन