शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उद्या रंगणार 'लोकमत महामॅरेथॉन'चा थरार, बारा लाखांपर्यंतची बक्षिसे; धावपटूंची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:01 IST

बीब एक्स्पो आज

कोल्हापूर : प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या लोकमतकोल्हापूर महामॅरेथॉनच्या आठव्या पर्वाचा प्रत्यक्ष थरार उद्या रविवारी (दि. २३) पोलिस परेड मैदानावर रंगणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी व्यावसायिक धावपटूंसह सर्वसामान्य आबालवृद्ध सहभागी होण्यासाठी आतूर आहेत. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. राज्यासह परराज्यातील व्यावसायिक धावपटूंनी नावनोंदणी करीत या महामॅरेथॉनला विशेष पसंती दिली आहे.

कोल्हापुरात कसबा बावडा पोलिस परेड मैदानातून रविवारी पहाटे पाच वाजता या महामॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. सर्वच गटातील स्पर्धकांनी त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. जसजशी महामॅरेथॉनची वेळ जवळ येईल तशी धावपटूंचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक क्रीडा संघटना, ग्रुप, महिला मंडळ, क्लब, असोसिएशन, संस्था, उद्योग, कारखाने आणि विद्यार्थ्यांनी नोंदणीला प्राधान्य दिले आहे.

अनेकांनी आठव्या पर्वाची सुरुवात झाल्यानंतर तत्काळ नोंदणी करून आपला सहभाग निश्चित केला. विशेष म्हणजे, मित्रमंडळींसह सहकुटुंब महामॅरेथॉनचे बुकिंग केले आहे. बहुतांश फॅमिली रन करणारे ३ आणि ५ किलोमीटर शर्यतीत धावणार आहेत. वैयक्तिक धावणारे हौशी व व्यावसायिक धावपटू १० आणि २१ किलोमीटरच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत. या सर्वांचा एक अनोखा मेळाच पोलिस परेड मैदानावर रंगणार आहे.

बारा लाखांपर्यंतची बक्षिसेमॅरेथॉनमध्ये २१ आणि १० किलोमीटरमधील विजेत्यांना वयोगटनिहाय एकूण मिळून १२ लाख रुपयांची बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. तर ३, ५ किलोमीटरमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.

बीब एक्स्पो आजलोकमत महामॅरेथॉनचा आज (शनिवारी) सकाळी १० वाजता पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये बीब एक्स्पो होणार आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना टी-शर्ट, बीब (चेस्ट नंबर) गुडी बॅगचे वाटप केले जाणार आहे.

सर्व सहभागी धावपटूंनी पहाटे ५ वाजता एकत्र यायचे आहेअशी असेल वेळ२१ किमी मॅरेथॉन५.३० : पेसर्सची ओळख, धावण्याचा मार्गाची माहिती५.४० : वॉर्मअप६ :०० : रेस सुरू

१० किमी रेसची सुरुवातसकाळी ६:३० वाजता५ आणि ३ किलोमीटर धावपटूंनी साडेपाच वाजता एकत्र यायचे आहे.

स्पर्धेची सुरुवात५ किमी : सकाळी ६:४० वाजता३ किमी : ६ वा.५० वाजतासखी रन ३ किलोमीटर६ वाजून ५५ मिनिटे

महामॅरेथॉन झाल्यानंतर तिथेच थोड्याच वेळात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.

अल्पोपाहाराची सोयमॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना उपमा, केळी, दूध आणि प्रोटिन बार अशा अल्पोपाहाराचे वाटप रेस संपल्यानंतर करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarathonमॅरेथॉनLokmatलोकमत