‘लोकमत उडाण’ करिअर मार्गदर्शन व्याख्यान शुक्रवारी
By Admin | Updated: April 7, 2015 01:17 IST2015-04-07T00:56:46+5:302015-04-07T01:17:10+5:30
बारावीनंतरच्या संधीची मिळणार माहिती

‘लोकमत उडाण’ करिअर मार्गदर्शन व्याख्यान शुक्रवारी
कोल्हापूर : बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी लोकमत आणि मुंबई येथील मोन्जी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडी यांच्यातर्फे लोकमत उडाण या करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे़ कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे शुक्रवारी (दि़ १०) दुपारी चार वाजता हे व्याख्यान होणार आहे़ या व्याख्यानातून करिअरच्या संधींची माहिती मिळेल.नर्सी मोन्जी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजचे तज्ज्ञ प्राध्यापक बारावीनंतर काय आणि विद्यार्थ्यांसमोरचे नवे पर्याय या विषयावर मार्गदर्शन करतील़ यावेळी इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट, पायलट, फार्मासिस्ट, फायनान्स तसेच मेडिकल, आदी क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, याची माहिती देण्यात येणार आहे़
बारावीच्या वर्गात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला की बारावीनंतर काय करायचे, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो़ अनेक वेळा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे विद्यार्थी मार्ग चुकतात आणि अपयश पदरात पडते़ त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना योग्य वेळी मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़
या व्याख्यानासाठी विद्यार्थी आणि पालकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे़ कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका लोकमत कार्यालय, पौर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळा, लक्ष्मीपुरी येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत उपलब्ध आहेत़ अधिक माहितीसाठी ९७६७२६४८८५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)