शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट : केशवरावमध्ये सुविधांची तातडीने पूर्तता करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 14:08 IST

कोल्हापुरच्या कलाक्षेत्राचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या गैरसोयींची तातडीने दखल घेत गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कलाकार व प्रेक्षकांसाठी अत्यावश्यक असलेले पिण्याचे पाणी, मेकअप रुम, स्वच्छतागृहांची स्वच्छता या प्राथमिक गरजांची २४ तासांच्या आत पूर्तता करण्याचे आदेश त्यांनी दिले.

ठळक मुद्दे लोकमत इफेक्ट : केशवरावमध्ये सुविधांची तातडीने पूर्तता कराआयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

कोल्हापूर : कोल्हापुरच्या कलाक्षेत्राचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या गैरसोयींची तातडीने दखल घेत गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कलाकार व प्रेक्षकांसाठी अत्यावश्यक असलेले पिण्याचे पाणी, मेकअप रुम, स्वच्छतागृहांची स्वच्छता या प्राथमिक गरजांची २४ तासांच्या आत पूर्तता करण्याचे आदेश त्यांनी दिले.राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या आणि पाच वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात नुतनीकरण झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील गैरसोयींवर लोकमतच्या गुरुवारच्या अंकात विशेष वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. आज शुक्रवारपासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा आणि आयुक्तांनी मे महिन्यात घेतलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तसाहेब केशवरावचं पुढं काय झालं या मथळ््याखाली गैरसोयींवर प्रकाश टाकण्यात आला. आयुक्तांनी या वृत्ताची तातडीने दखल शुक्रवारी सकाळीच नाट्यगृहाशी संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली व प्राथमिक गरजांची तातडीने पूर्तता करण्याचे आदेश दिले.परिसरात चोवीस तासांच्या आत पिण्याच्या पाण्याची सोय करा, मेकअप रुमची दुरुस्त, वातानुकुलित यंत्रणा (एसी)चे पॉवर प्लान्ट व त्याचे बिघडलेले सॉफ्टवेअर बदला, स्वच्छतागृहांची तातडीने स्वच्छता करून घ्या असे त्यांनी सांगितले. तसेच पुढील काही दिवसात वायरमन व इलेक्ट्री शियनची नियुक्ती करा, नाट्यगृहाच्या बाबतीत कोणतिही दिरंगाई किंवा वेळकाढूपणा करू नका अथवा कारणं सांगू नका अशी सक्त सुचनाही त्यांनी केली. नाट्यगृहाच्या कामासाठी विविध विभागांना पाठवल्या जाणाऱ्या नवीन पत्राची एक कॉपी माझ्याकडे सादर करा असेही त्यांनी सांगितले.दहा हजारांचा राखीव फंडनाट्यगृहातील किरकोळ दुरुस्त्या, लहान मोठ्या कामांसाठी किमान दहा हजारांचा राखीव फंड काढून ठेवण्याची सुचना आयुक्तांनी केली. नाट्यगृहासाठी दर महिन्याला कोणत्या गोष्टी लागतात त्यांची तयार करून लगेचच मंजूरी घ्या, मंजुरी नाही म्हणून काम थांबवू नका तसेच दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांसाठी दर महिन्याला बैठक घेण्यासही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Natakनाटकkolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिकMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त