‘लोकमत’ दीपोत्सव महाबंपर लकी ड्रॉची सोमवारी सोडत
By Admin | Updated: November 27, 2015 01:04 IST2015-11-27T00:50:56+5:302015-11-27T01:04:54+5:30
‘बुलेट’सह लाखोंची बक्षिसे : ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटकाचा विशेष प्रयोग

‘लोकमत’ दीपोत्सव महाबंपर लकी ड्रॉची सोमवारी सोडत
कोल्हापूर : व्यावसायिकांना दसरा-दिवाळी दरम्यान जाहिरातीद्वारे आपल्या उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविता यावी व ग्राहकांचा खरेदीचा लाखोंच्या बक्षिसांनी द्विगुणीत व्हावा या दुहेरी उद्देशाने राजाकाका ई-मॉल आणि मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ प्रस्तुत ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ योजना आयोजित केली होती. या योजनेचा ‘महाबंपर लकी ड्रॉ’ची सोडत सोमवारी (दि. ३०) रोजी राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता सोडत होणार आहे.
‘महाबंपर लकी ड्रॉ’ सोडतीसोबतच मराठी अभिनेता संदीप पाठक यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री विनोदी नाटकांचा विशेष प्रयोग उपस्थितांना पाहण्यास मिळणार आहे. मंगलमय उत्साहाचे आनंददायी शॉपिंगची संधी देणाऱ्या या योजनेत बंपर बक्षीस म्हणून ‘बुलेट’सह लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
महाबंपर लकी ड्रॉ सोडतीवेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रायोजक, ग्राहक, विक्रेते, वाचक, आदींची उपस्थिती असणार आहे. दि. १३ आॅक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत ही योजना घेण्यात आली. त्यात ग्राहकांनी ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ योजनेतील सहभागी व्यावसायिकांच्या दुकानांतून वस्तूंची खरेदी केल्यास त्यांना लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते. ‘दसरा’ व दिवाळीपूर्वी दोन लकी ड्रॉ काढण्यात आले. त्यानंतर या ‘महाबंपर लकी ड्रॉ’ची सोडत होणार आहे. दसरा व दिवाळीपूर्वी काढण्यात आलेल्या ग्राहकांनाही या महाबंपर ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे. या योजनेचे रॉयल ब्ल्यू मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, व्ही. काकडे सराफ, अॅक्वॉ क्रिस्टल, सुभाष फोटोज्, वारणा, जसवंत स्वीटस् हे प्रायोजक आहेत. (प्रतिनिधी)
अशी आहेत बक्षिसे....
या योजनेतील बंपर प्राईज ड्रॉ विजेत्याला बुलेट ही दुचाकी भेट देण्यात येणार आहे तसेच बंपर ड्रॉतील प्रथम क्रमांक विजेत्याला एलईडी टीव्ही, द्वितीय क्रमांकाच्या तीन विजेत्यांना ९ हजार ९९९ रुपयांचे सोने, तृतीय क्रमांकाच्या सहा विजेत्यांना वॉटर प्युरिफायर, चौथ्या क्रमांकाच्या सहा विजेत्यांना होमथिएटर, पाचव्या क्रमांकाच्या तीन विजेत्यांना मायक्रो ओव्हन, सहाव्या क्रमांकाच्या नऊ विजेत्यांना डिजिटल कॅमेरा, सातव्या क्रमांकाच्या दोन विजेत्यांना इंडक्शन कुकर, आठव्या क्रमांकाच्या वीस विजेत्यांना मोबाईल आणि नवव्या क्रमांकाच्या वीस विजेत्यांना इस्त्री बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त लकी ड्रॉतून उत्तेजनार्थ बक्षिसेही ग्राहकांना जिंकण्याची संधी मिळणार आहे
तुफान विनोदी नाटक
‘वऱ्हाड निघालंय लंडन’ला या तुफान विनोदी एकपात्री नाटकाचा प्रयोग अभिनेते संदीप पाठक ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ च्या महाबंपर लकी ड्रॉदरम्यान दाखविले जाणार आहे. अशिक्षित कुटुंबातील एका मुलाचे लग्न लंडनमधील तरुणीशी ठरते व विवाहासाठी सर्व कुटुंब लंडनला जायला निघतात आणि त्यानंतर कशा गमती-जमती या प्रवासात घडतात याचे वर्णन या प्रयोगात पाहायला मिळते. संदीप पाठक ही एकच व्यक्ती या प्रयोगात वेगवेगळ्या भूमिका पार पाडणार आहेत. दोन तास रसिकांना हसविणाऱ्या या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ वाचकांनी घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ व्यवस्थापनाने केले आहे. .
मोफत प्रवेश
सखी मंच, बाल विकास मंच व युवा नेक्स्ट सदस्य व परिवारांसाठी कार्यक्रमाच्या मोफत मर्यादित प्रवेशिका लक्ष्मीपुरी येथील लोकमत शहर कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे. तरी शहर कार्यालयातून मोफत प्रवेशिका घेऊन जावेत, असे आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.
तुफान विनोदी नाटक
‘वऱ्हाड निघालंय लंडन’ला या तुफान विनोदी एकपात्री नाटकाचा प्रयोग अभिनेते संदीप पाठक ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ च्या महाबंपर लकी ड्रॉदरम्यान दाखविले जाणार आहे. अशिक्षित कुटुंबातील एका मुलाचे लग्न लंडनमधील तरुणीशी ठरते व विवाहासाठी सर्व कुटुंब लंडनला जायला निघतात आणि त्यानंतर कशा गमती-जमती या प्रवासात घडतात याचे वर्णन या प्रयोगात पाहायला मिळते. संदीप पाठक ही एकच व्यक्ती या प्रयोगात वेगवेगळ्या भूमिका पार पाडणार आहेत. दोन तास रसिकांना हसविणाऱ्या या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ वाचकांनी घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ व्यवस्थापनाने केले आहे.