‘लोकमत’चे विश्वास पाटील इस्रायल दौऱ्यावर
By Admin | Updated: April 25, 2015 00:45 IST2015-04-25T00:32:08+5:302015-04-25T00:45:24+5:30
जागतिक कृषी व तंत्रज्ञान प्रदर्शनास (अॅग्रीटेक) उपस्थित

‘लोकमत’चे विश्वास पाटील इस्रायल दौऱ्यावर
कोल्हापूर : ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास शामराव पाटील हे इस्रायल येथे २८ ते ३० एप्रिलदरम्यान होणाऱ्या जागतिक कृषी व तंत्रज्ञान प्रदर्शनास (अॅग्रीटेक) उपस्थित राहणार आहेत. इस्रायल सरकारच्या खास निमंत्रणावरून भारतातून निवडक वृत्तपत्र समूहांचे प्रतिनिधी या प्रदर्शनासाठी जात आहेत. त्यांमध्ये पाटील यांचा समावेश आहे.
विश्वास पाटील हे गेली वीस वर्षे पत्रकारितेत आहेत. शेती, सहकार, साखर कारखानदारी हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीसंबंधी त्यांनी यापूर्वी संशोधनात्मक अभ्यास केला आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे त्यांची या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
तेल अवीवमधील इस्रायल ट्रेड फेअर आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे प्रदर्शन होत आहे. यंदाचे हे एकोणिसावे प्रदर्शन आहे. दर तीन वर्षांनी होणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी जगभरातील प्रयोगशील शेतकरी, कृषी-तंत्रज्ञानाशी संबंधित संस्था आवर्जून जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या प्रदर्शनास भेट देणार आहेत.