लोकमत बाल विकास मंच सदस्यता नोंदणी सुरू
By Admin | Updated: September 27, 2014 23:13 IST2014-09-27T23:13:25+5:302014-09-27T23:13:25+5:30
मागील १० वर्षांपासून विद्यार्र्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमत बाल विकास मंच झटत आहे. स्पर्धा वाढली, अत्याधुनिक साधनांचा वापर वाढला, नवीन विचार तंत्रज्ञानसुद्धा वाढले, मग लोकमत बालविकास

लोकमत बाल विकास मंच सदस्यता नोंदणी सुरू
चंद्रपूर : मागील १० वर्षांपासून विद्यार्र्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमत बाल विकास मंच झटत आहे. स्पर्धा वाढली, अत्याधुनिक साधनांचा वापर वाढला, नवीन विचार तंत्रज्ञानसुद्धा वाढले, मग लोकमत बालविकास मंचसुद्धा मागे राहिला नाही, बालमनाचा सच्चा सवंगडी यावर्षीही आपल्यासाठी नवनवीन उपक्रम आणि भेटवस्तू घेऊन आला आहे.
सदस्यता नोंदणीला बच्चे कंपनीने भरपूर प्रतिसाद दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक शाळेत आवर्जुन भेटीला आम्ही येत आहेत. उद्देश एवढाच प्रत्येक मुलांपर्यंत बाल विकास मंच पोहोचावा आणि म्हणून शहरात आणि प्रत्येक शाळेत लोकमत बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी धडाक्यात सुरू आहे. केवळ शहरापुरताच मर्यादित न राहता लोकमत बाल विकास मंच थेट ग्रामीण विभागापर्यंत पोहोचला आहे, ग्रामीण विभागातील मुलांसाठीसुद्धा हक्काचे व्यासपीठ असावं त्यांनासुद्धा आपल्या कलागुणांच्या भरोशावर काहीतरी कामगिरी करता यावी यासाठी लोकमत बाल विकास मंचने त्यांच्याशी मैत्री केली आहे.
शहर असो वा ग्रामीण, लोकमत बाल विकास मंचच्या व्यासपिठाने सर्वांसाठी हात समोर केला आहे. आता वेळ आहे तुमची साथ देण्याची. तेव्हा बच्चे कंपनी तयार व्हा आणि आम्हच्या परिवारात सामील व्हा. सदस्यता नोंदणी आजही तुमची वाट पहात आहे.
वर्षभर विविध कार्यक्रम, आकर्षक भेटवस्तू याशिवाय आत्मविश्वास लोकमत बाल विकास मंच निश्चितच देणार आहे. याशिवाय आकर्षक भेटवस्तू जसे- वॉटर बॉटल, सक्सेस स्टोरी बुक, डायमंड नमकिन, दिनशॉज आईस्क्रीम कूपन, वाघमारे मिरची पावडर, सावजी मॅजिक मिक्स, खिंडशी वॉटर पार्क कूपन व आकर्षक ओळखपत्र यांचा समावेश असणार आहे.
एवढेच नव्हे तर, बौद्धिक विकास वाढावा याकरिता ज्ञान वाढवणारे ज्ञानगंगा अभिनव योजना यामध्ये लाखो रुपयांचा आकर्षक बक्षिसांचा वर्षाव राहील. तालुकानिहाय विविध शाळांमध्ये लोकमत बालविकास मंचची माहिती व सदस्यता नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)