‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’चे आज उद्घाटन
By Admin | Updated: June 4, 2016 00:31 IST2016-06-04T00:01:56+5:302016-06-04T00:31:07+5:30
करिअर, शिक्षणाचे सर्वोत्तम पर्याय, सर्वांगीण सल्ला : तज्ज्ञांचे मार्गदर्शन; एकाच छताखाली विविध अभ्यासक्रमांची माहिती

‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’चे आज उद्घाटन
कोल्हापूर : शिक्षण व करिअरचे सर्वोत्तम पर्याय, सर्वांगीण सल्ला आणि सर्वव्यापी पर्यायांचा समावेश असलेल्या ‘रोबोमेट प्लस’ प्रस्तुत ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ या भव्य शैक्षणिक प्रदर्शनाला आज, शनिवारपासून प्रारंभ होणार आहे. राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, महेश ट्युटोरियल लक्ष्यचे डॉ. सुरेंद्र सिंग, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य रामचंद्र पाटील, शिवगंगा व्हील्सचे सुरेश काशीद, दि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक केशव जोशी हे प्रमुख उपस्थित असतील.
करिअर निवडीबाबतचा मनातील गोंधळ, शंका दूर करणारे ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक रोबोमेट प्लस हे असून डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अॅँड इंजिनिअरिंग हे सहप्रायोजक आहेत, तर दि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, ट्रिनिटी, शिवगंगा सुझुकी हे सहायक प्रायोजक आहेत. हे प्रदर्शन शनिवारपासून सोमवार (दि. ६) पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. विविध नामांकित शिक्षण संस्था यात सहभागी झाल्या आहेत. शिवाय विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. ते विद्यार्थी, पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. सामान्य ज्ञान स्पर्धा होणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून इच्छुकांनी भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल’ होण्याची संधी
‘लोकमत युवा नेक्स्ट’ व ‘बाल विकास मंच’तर्फे आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता ‘कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल-३’ स्पर्धा होणार आहे. त्याच्या प्रश्नपत्रिकेत चालू घडामोडी, अंकगणित व बौद्धिक क्षमतेवर आधारित ५० प्रश्न असतील. त्यांपैकी ४० प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
नामांकित शैक्षणिक संस्थांचा सहभाग
दहावी-बारावीच्याच नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांना ‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ फायद्याचे ठरणार आहे. यात पाल्याने कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, आदी प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, फॅशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझायनिंग व रिटेल, आयटीआय, अॅनिमेशन, एव्हिएशनपासून मीडिया, गेमिंगपर्यंतची माहिती उपलब्ध होणार आहे. विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, हॉटेल मॅनेजमेंट, फॉॅरिन लॅँग्वेजेस, स्पोकन इंग्लिश, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट यासह मुंबई, पुणे, नागपूरमधील विविध नामवंत संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.