उदंड प्रतिसादात ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ सुरू

By Admin | Updated: June 14, 2015 01:51 IST2015-06-14T01:51:54+5:302015-06-14T01:51:54+5:30

विद्यार्थी, पालकांची गर्दी : करिअर मार्गदर्शनाचा खजिना खुला, व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात सोमवारपर्यंत शैक्षणिक मेळा

The 'Lokmat Aspire Education Fair' has been started in a huge response | उदंड प्रतिसादात ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ सुरू

उदंड प्रतिसादात ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ सुरू

कोल्हापूर : आयुष्याला वळण देणाऱ्या दहावी आणि बारावीनंतर करिअरची नेमकी क्षेत्रे कोणती, त्यांची निवड कशी करावी, अशा अनेक प्रश्नांचे अचूक उत्तर असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चे शनिवारी पालक व विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादात उद्घाटन झाले. राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात उद्या, सोमवारपर्यंत हा शैक्षणिक मेळा भरणार आहे.
विद्यार्थ्यांना करिअरची दिशा मिळण्यासाठी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन ‘महेश ट्युटोरियल’चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ. सुरेंद्र सिंग, ‘संजीवन नॉलेज सिटी’चे सहसचिव एन. आर. भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेडचे वरिष्ठ मंडल प्रबंधक गणेश आपटे, केशव जोशी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून, फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या प्रदर्शनातील व्याख्याने, स्पर्धा, आदी कार्यक्रमांचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत करिअर बुक’चे प्रकाशन झाले.
‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविकात ‘लोकमत’च्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’च्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. इव्हेंट विभागप्रमुख दीपक मनाठकर यांनी स्वागत केले. ‘सखी मंच’ संयोजिका प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी आभार मानले.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात करिअरचे क्षेत्र निवडण्याबाबत अनेक प्रश्न असतात. त्यांची योग्य उत्तरे देणारे ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन आहे. यात विद्यार्थी, पालकांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन होत असल्याने पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात विविध मान्यवर शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या असून, स्टॉलवर अभ्यासक्रमांची माहिती दिली जात आहे. प्रत्येक विद्यार्थी, पालकांना अभ्यासक्रमांचे माहितीपत्रक देऊन स्टॉलवरील व्यक्ती प्रत्यक्ष संवाद साधून मार्गदर्शन करीत आहे. प्रत्येक स्टॉल विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलला होता. शहरासह जिल्ह्णातील विविध परिसरांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटन होण्यापूर्वीच सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली होती. या प्रदर्शनांतर्गत दिवसभरात झालेल्या व्याख्यानांना विद्यार्थी, विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. दरम्यान, हे प्रदर्शन उद्या, सोमवारपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक महेश ट्युटोरियल लक्ष्य, तर सहप्रायोजक संजीवन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पन्हाळा हे आहेत.
अर्ज कोण घेऊन गेले होते?
ओलम अ‍ॅग्रो इंडिया लिमिटेड, उद्योजक देवीदास पाटील (बेळगाव), तासगावकर शुगर प्रायव्हेट लिमिटेड, चंदगड तालुका खरेदी-विक्री संघ. (प्रतिनिधी)
 

Web Title: The 'Lokmat Aspire Education Fair' has been started in a huge response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.