‘लोकमान्य’ची आकर्षक परताव्याची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:20+5:302021-09-09T04:30:20+5:30
कोल्हापूर : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या स्थापनेला २६ वर्षे होत आहेत. यानिमित्ताने १ ते ३० सप्टेंबर या ...

‘लोकमान्य’ची आकर्षक परताव्याची योजना
कोल्हापूर : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या स्थापनेला २६ वर्षे होत आहेत. यानिमित्ताने १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत विशेष योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
ही योजना फक्त २६ महिन्यांच्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान गुंतवणूक २१ हजार २५० व त्या पटीत करावयाची असून, काही अटींवर सभासदांच्या लहान मुला-मुलींनाही सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या लोकमान्यच्या शाखेशी संपर्क साधावा.
एका छोट्या कार्यालयातून १९९५ मध्ये सुरू झालेली ही संस्था एक विश्वासू आणि आपुलकीने व्यवहार करणारी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. सुरक्षितता, विश्वासार्हता, व्यावसायिकता आणि पारदर्शकता या चतुसूत्रीच्या जोरावर लोकमान्यची घोडदौड सुरू असून, २१३ शाखांच्या माध्यमातून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व राजधानी दिल्ली येथे कार्यरत आहे.