लोकमान्य सोसायटीतर्फे ‘सुरक्षा समृद्धी ठेव’ योजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:52+5:302021-05-07T04:25:52+5:30
कोल्हापूर : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आरोग्य विमा संरक्षणासह (कोविडसह) लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. ...

लोकमान्य सोसायटीतर्फे ‘सुरक्षा समृद्धी ठेव’ योजना सुरू
कोल्हापूर : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आरोग्य विमा संरक्षणासह (कोविडसह) लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. यात सुरक्षा समृद्धी व सुरक्षा समृद्धी ॲडव्हान्टेज या दोन प्रकाराचा समावेश आहे.
या योजनेंतर्गत ही मुदत ठेव योजना १ वर्षाची मुदतीची असून ८.५० टक्के व्याज दराने उपलब्ध आहे. सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांना आरोग्य विमा संरक्षणासह (कोविडसह) एक लाखापर्यंत विमा सरंक्षण मिळते. योजनेत कमीत कमी एकरकमी २ लाख किंवा एक हजाराच्या पटीत गुंतवणूक करावी लागणार आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. दोन लाखांच्या गुंतवणुकीवर १ लाख रुपयांचा आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड-१९ सहित) आहे. यात प्रतिदिन ५० दिवसांपर्यंत रोज रुपये दोन हजारपर्यंतचा रुग्णालयीन खर्च मिळतो. सोबत २ लाख ५० हजार किंवा जास्त गुंतवणुकीवर सभासद लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव ॲडव्हान्टेज प्लानमध्ये सहभागी होऊ शकतात. एक लाख आरोग्य विमा संरक्षणासह प्रतिदिन अशी २५ दिवसांपर्यंत रोज ४ हजार रुपयांरपर्यंतचा रुग्णालयीन खर्च मिळतो. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे मुदत ठेव ठेवल्यास ठेवीच्या वेळी ठेवीदारांकडून प्रथम धारकाच्या नावाने पाॅलिसी जारी केली आहे.
या योजनेत १८ ते ६५ वयोगटातील सभासद सहभागी होऊ शकतात. योजना ३ मे ते ३१ जुलै २०२१ या मर्यादित कालावधीतच सुरू आहे. जवळील शाखेशी संपर्क साधून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.
फोटो : ०६०५२०२१-कोल-लोकमान्य न्यूज लोगो