लोकसभेत ‘बेळगाव’ असाच उल्लेख
By Admin | Updated: December 2, 2014 00:49 IST2014-12-02T00:41:16+5:302014-12-02T00:49:37+5:30
केंद्राच्या परवानगीबाबत प्रश्न उपस्थित

लोकसभेत ‘बेळगाव’ असाच उल्लेख
बेळगाव : ‘बेळगाव’ शहराचे नामांतर ‘बेळगावी’ असे करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली होती आणि त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाव शहराचे नाव या अगोदरच ‘बेळगावी’ असे वापरायला सुरुवात केली आहे. मात्र, आज, सोमवारी लोकसभेत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि बेळगावचे भाजपचे खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगाव शहराचा उल्लेख बेळगाव म्हणजे इंग्लिशमध्ये ‘बेलगाम’ असाच केला आहे.
त्यामुळे केंद्राने परवानगी दिली असूनही देशाच्या सर्वोच्च सभागृहात बेळगाव उल्लेख झाल्याने केंद्राने परवानगी दिली आहे की, नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे
आज, दुपारी भाजपचे खासदार सुरेश अंगडी यांनी लोकसभेत बोलताना ‘बेलगाम’ असा बेळगाव शहराचा उल्लेख केला. याशिवाय स्पीकर नी सुद्धा शहराचे नाव ‘बेळगाव’ असेच संबोधले. बेळगाव शहरतील वकील गेल्या १५ दिवसांपासून काम बंद आंदोलन करीत असून, बेळगावात कर्नाटक प्रशासकीय लवादाच्या खंडपीठाची स्थापना करावी, अशी मागणी खासदार अंगडी यांनी लोकसभेत केली आहे .