शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 16:22 IST

Lok Sabha Election 2024 : उद्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत, निकालाआधीच आता कोल्हापूरात शाहू माहारांचे पोस्टर लागले आहेत.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : उद्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. निकालाची अनेकांना उत्सुकता लागली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत झाली. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांनी तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवली. दरम्यान, आता निकालाआधीच कोल्हापूर शहरात शाहू महाराज यांच्या विजयाचे पोस्टर लागले आहेत. 

लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीने जोरदार प्रचार केला होता. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही जोरदार प्रचार केला होता. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. आधी महाविकास आघाडीसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या क्षणी एकतर्फी राहिली नव्हती. महायुतीनेही जोरदार प्रचार केला होता. 

एक्झिट पोलमध्येही शाहू महाराज आघाडीवर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांना तर महायुतीने खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, टिव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार, या मतदारसंघात शाहू महाराज आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. ४ जून रोजी लोकसभेचे निकाल समोर येणार आहेत.   

कोल्हापुरच्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता निकालाच्या आदल्या दिवशी विजयाचे पोस्टर झळकले आहेत. मविआने छत्रपतींच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मतदानाच्या दिवशीही छत्रपतींचा प्रभाव दिसून आला.  आता निकालाच्या आदल्या दिवशी खासदार म्हणून पोस्टर झळकले आहेत. "पोस्टरवर कोल्हापुरचा राजा, शाहू छत्रपती खासदार मजकूर आहे.  मिरजकर तिकटी परिसरात हे पोस्टर लावण्यात आले आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांना तर महायुतीने शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती. तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे पण निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. दरम्यान, आता टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार, ठाकरे गटाचे सत्यजित पाटी आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४