पन्हाळा शहरात एप्रिल महिन्यापासून ५० रुग्ण कोरोना संक्रमित झाले असून सध्या त्यातील १८ रुग्ण बरे झाले आहेत ३१ रुग्ण उपचार घेत असून एक रुग्ण मृत झाला आहे सद्य:स्थितीत कोरोना संक्रमण वाढते दिसून येत असलेने अखेरच्या उपायांनुसार संपूर्ण शहर टाळेबंदी(लॉकडाऊन) करणे गरजेचे असलेने ते तहसीलदार रमेश शेंडगे यांचे आदेशाने मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी निर्णय घेऊन पुढील दहा दिवस बंद ठेवले आहे. यावेळी किराणा/भाजीपाला/फळे/कृषी/पशुखाद्य आदी दुकाने यांना फक्त घरपोच सुविधा देता येईल.
दूध विक्री या कालावधीत रोज सकाळी ७ ते सकाळी ९ अशी सुरू राहील.
इतर सर्व खासगी आस्थापना/व्यवसाय/दुकाने बंद. मेडिकल/वैद्यकीय सुविधा/लसीकरण नेहमीप्रमाणे सुरू राहील.