वडगावात लाॅकडाऊनला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:42+5:302021-05-17T04:22:42+5:30
सात दिवस शहर बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका ...

वडगावात लाॅकडाऊनला सुरुवात
सात दिवस शहर बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी हा आदेश दिला होता. सकाळच्या सत्रात अत्यावश्यक व तातडीच्या सेवा, वैद्यकीय सेवा सुरू होत्या.
या पार्श्वभूमीवर पालिका व पोलीस प्रशासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. काल क्रेझी कापड दुकानावर दहा हजार दंडाची कारवाई केली होती.
आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर पावसामुळे कोणी रस्त्यावर आले नाहीत. पोलीस ठाणा हद्दीतील गावात पोलीस, होमगार्डच्या मदतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.