शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दारूभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या एक्साइजच्या पथकावर हल्ला, उपनिरीक्षकासह जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:31 IST

कोल्हापूर : मोतीनगर येथे गावठी दारूभट्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साइज) पथकावर स्थानिकांनी हल्ला केला. सोमवारी ...

कोल्हापूर : मोतीनगर येथे गावठी दारूभट्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साइज) पथकावर स्थानिकांनी हल्ला केला. सोमवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या घटनेत एक्साइजमधील महिला उपनिरीक्षकासह एक जवान जखमी झाला. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तीन महिलांसह चौघांना अटक झाली.बेकायदेशीर गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी एक्साइजचे पथक मोतीनगर येथे गेले होते. पथकाने कारवाई सुरू करताच काही महिला आणि पुरुषांनी विरोध केला. दोन महिला वाहनांच्या आडव्या पडल्या. त्यांना उठवताना पथकातील जवान आणि स्थानिकांमध्ये जोरदार झटापट झाली. स्थानिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत उपनिरीक्षक कोमल यादव आणि जवान राहुल गुरव जखमी झाले. झटापटीत विरोध करणारी एक महिला बेशुद्ध पडल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली.दरम्यान, एक्साइजच्या अधिकाऱ्यांनी राजारामपुरी पोलिसांना कळवले. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चार महिलांना ताब्यात घेतले. कारवाईसाठी गेलेल्या पथकावरच हल्ला झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

यांना झाली अटकरिया विजय अभंगे (वय १९), रेखा विजय अभंगे (३७), नितू गणेश पाटील (४५) आणि विजय कांती अभंगे (४२, चौघे रा. मोतीनगर, कोल्हापूर) यांना पोलिसांनी अटक केली. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान राहुल सदाशिव गुरव (वय ३८) यांनी फिर्याद दिली.

दोन्ही यंत्रणा धास्तावल्याकारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाल्याने एक्साइजच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यापासून ते फिर्याद देण्यापर्यंत वरिष्ठ अधिकारी स्वत: उपस्थित होते. हद्दीत दारू भट्ट्या सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने राजारामपुरी पोलिसांचीही पंचाईत झाली.धाडस का वाढले?निवडणूक काळात पोलिस आणि एक्साइजच्या पथकांनी गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. काही दिवसांत त्या कोणाच्या आशीर्वादाने पुन्हा सुरू झाल्या, याचा शोध घेण्याची गरज आहे. अवैध व्यावसायिकांना बळ देणाऱ्या छुप्या यंत्रणांमुळेच त्यांचे पथकांवर हल्ला करण्याचे धाडस वाढल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग